आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 27 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने दिलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकांत 8 गडी गमावून 140 धावाच करता आल्या.
पथिरानाच्या 3 विकेट
दिल्लीकडून रिले रुसोने सर्वाधिक 35 धावा केल्या. त्यानंतर मनीष पांडेने 27, अक्षर पटेलने 21, फिलिप सॉल्टने 17 धावा केल्या. चेन्नईकडून मथीषा पथिरानाने 3, दीपक चहर 2, तर रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.
दिल्लीचा डाव
तत्पूर्वी चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 8 गडी गमावून 167 धावा करत दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. दीपक चहरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर चहरनेच तिसऱ्या षटकात फिलिप सॉल्टलाही 17 धावांवर बाद केले. यानंतर चौथ्या षटकात मिशेल मार्श धावबाद झाला. यानंतर मनीष पांडे आणि रिले रुसोने डाव सावरत चौथ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. तेराव्या षटकात मनीष पांडेला 27 धावांवर बाद करत मथीषा पथिरानाने ही जोडी फोडली. त्यानंतर पंधराव्या षटकात रविंद्र जडेजाने रिले रुसोला 35 धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात पथिरानाने अक्षर पटेलला 21 धावांवर बाद केले. यानंतर एकोणिसाव्या षटकात रिपल पटेल 10 धावांवर धावबाद झाला. तर विसाव्या षटकात पथीरानाने ललित यादवला बोल्ड केले. दिल्लीला 20 षटकांत 8 गडी गमावून 140 धावांपर्यंतच मजल मारता आली.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या दिल्लीच्या विकेट
दिल्लीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईच्या फलंदाजांचे लोटांगण
दिल्लीच्या गोलंदाजीसमोर चेन्नईची फलंदाजी ढेपाळल्याचे चित्र बघायला मिळाले. चेन्नईच्या एकाही फलंदाजाला 25 च्या वर धावा करता आल्या नाही. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 24, अंबाती रायुडूने 23, रविंद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणेने प्रत्येकी 21, महेंद्रसिंह धोनीने 20 धावा केल्या. दिल्लीकडून मिशेल मार्शने 3, हर्षल पटेलने 2, तर खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
चेन्नईचा डाव
चेन्नईला ओपनर डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाडने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी केली. पाचव्या षटकात कॉनवेला 10 धावांवर बाद करत अक्षर पटेलने ही जोडी फोडली. त्यानंतर अक्षरनेच सातव्या षटकात ऋतुराज गायकवाडला 24 धावांवर बाद केले. नंतर दहाव्या षटकात कुलदीप यादवने मोईन अलीला 7 धावांवर, बाराव्या षटकात ललित यादवने अजिंक्य रहाणेला 21 धावांवर, पंधराव्या षटकात मिशेल मार्शने शिवम दुबेला 25 धावांवर, सतराव्या षटकात खलील अहमदने अंबाती रायुडूला 23 धावांवर बाद केले. अखेरच्या षटकांत रविंद्र जडेजा आणि धोनीने फटकेबाजी करत रंगत वाढवली. या दोघांनी सातव्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. मात्र या दोघांनाही मिशेल मार्शने शेवटच्या षटकात बाद केले. जडेजाने 21, तर धोनीने 20 धावा केल्या. चेन्नईला 20 षटकांत 167 धावांपर्यंतच मजल मारता आली.
अशा पडल्या चेन्नईच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग-11...
चेन्नई सुपर किंग्स: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रविंद्र जडेजा, महीश तीक्षणा, तुषार देशपांडे आणि दीपक चहर.
इम्पॅक्ट प्लेयर्स: मिशेल सँटनर, सुभ्रांशू संपाती, शेख रशीद, आकाश सिंह.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिले रूसो, अक्षर पटेल, अमन खान, रिपल पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद आणि ईशांत शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स: मुकेश कुमार, मनीष पांडेय, दुबे, अभिषेक पोरेल आणि चेतन सकरिया.
चेन्नई एका विजयाने प्लेऑफच्या जवळ पोहोचेल
11 सामन्यांत 6 विजय आणि एक अनिर्णित सामना जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज सध्या 13 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या हंगामात संघ प्रथमच दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. जर CSK ने त्यांच्याविरुद्ध विजय मिळवला, तर संघ 15 गुणांसह प्लेऑफ पात्रतेच्या जवळ जाईल. डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, महिश तेक्षाना आणि मथिश पाथिराना हे दिल्लीविरुद्धच्या संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात.
दिल्ली टीम घेऊ शकते मोठी झेप
दिल्ली कॅपिटल्स सध्या 10 सामन्यांत 4 विजय आणि 6 पराभवानंतर 8 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. संघाने साखळी फेरीत 5 सामने गमावून सुरुवात केली, परंतु शेवटच्या 5 सामन्यांमध्ये जबरदस्त पुनरागमन केले, त्यापैकी 4 जिंकले. आज चेन्नईविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून संघ दहाव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. चेन्नईविरुद्धच्या संघाचे 4 विदेशी खेळाडू मिचेल मार्श, कॅप्टन डेव्हिड वॉर्नर, फिलिप सॉल्ट आणि अॅनरिक नॉर्टया असू शकतात.
चेपॉकमध्ये दिल्लीने 6 सामने गमावले आहेत
आयपीएलमधील दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड बघितले तर या दोघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले गेले आहेत. चेन्नईने 17 आणि दिल्लीने 10 मध्ये विजय मिळवला. चेपॉक स्टेडियमवर, दिल्लीने केवळ 2 सामने जिंकले आहेत, तर 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.