आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमांचक सामन्यात राजस्थानची चेन्नईवर मात:अखेरच्या षटकांत जडेजा-धोनीची फटकेबाजी, संदीप शर्मा ठरला विजयाचा हिरो

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लीग स्टेजच्या सामन्यात राजस्थानने चेन्नईला 3 धावांनी हरवले. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकांत 6 गडी गमावून 172 धावाच करता आल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटचे षटक टाकणारा राजस्थानचा संदीप शर्मा विजयाचा हिरो ठरला.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

चेन्नईचा डाव

चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानने 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला तिसऱ्या षटकातच पहिला झटका बसला. चेन्नईचा ओपनर ऋतुराज गायकवाड 8 धावांवरच बाद झाला. संदीप शर्माने त्याला यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद केले. यानंतर अजिंक्य रहाणे व डेवॉन कॉनवेने संघाचा डाव सावरत पॉवर प्लेमध्ये संघाची धावसंख्या 45 वर नेली. मात्र रहाणे दहाव्या षटकात अश्विनच्या चेंडूवर आऊट झाला. अजिंक्यने 31 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेलाही अश्विनने बाराव्या षटकात आऊट केले. तर नंतर आलेला मोईन अलीही 7 धावा काढून अॅडम झम्पाच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर नंतर आलेल्या अंबाती रायडूला युजवेंद्र चहलने झेलबाद केले. तर डेवोन कॉनवेलाही युजवेंद्र चहलने झेलबाद केले. यानंतर धोनी व जडेजाने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज होती. मात्र संदीप शर्माच्या चेंडूवर धोनीला एकच धाव घेता आली आणि चेन्नईची विजयाची संधी थोडक्यात हुकली.

संदीप शर्माने ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली
संदीप शर्माने ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली

अशा पडल्या चेन्नईच्या विकेट

 • पहिलीः तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संदीप शर्माने ऋतुराज गायकवाडला यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद केले.
 • दुसरीः दहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अश्विनने रहाणेला पायचित केले.
 • तिसरीः बाराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने शिवम दुबेला पायचित केले.
 • चौथीः 14 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अॅडम झम्पाने मोईन अलीला संदीप शर्माच्या हाती झेलबाद केले.
 • पाचवीः पंधराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर युजवेंद्र चहलने अंबाती रायडूला हेटमायरच्या हाती झेलबाद केले.
 • सहावीः पंधराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर युजवेंद्र चहलने डेवोन कॉनवेला यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद केले.

गायकवाड स्वस्तात बाद

176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात सरासरीच राहिली. संघाने पॉवर प्लेमध्ये 45 धावा करताना एक विकेट गमावली. ऋतुराज गायकवाड 8 धावा करून बाद झाला.

रविंद्र जडेजाने 2 विकेट घेतल्या.
रविंद्र जडेजाने 2 विकेट घेतल्या.

राजस्थानकडून बटलरने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्यानंतर पडिक्कलने 38, अश्विन व हेटमायरने प्रत्येकी 30 आणि यशस्वीने 10 धावा केल्या. चेन्नईकडून रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे आणि आकाश सिंहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर मोईन अलीने 1 विकेट घेतली.

राजस्थानचा डाव

प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानला दुसऱ्या षटकातच पहिला झटका बसला. त्यांचा ओपनर यशस्वी जैस्वाल 10 धावांवर बाद झाला. तुषार देशपांडेने त्याची विकेट घेतली. यानंतर बटलर व पडिक्कलने राजस्थानचा डाव सावरत पॉवर प्लेमध्ये संघाची धावसंख्या 57 वर नेली. यानंतर नवव्या षटकात जडेजाने पडिक्कलला 38 धावांवर कॉनवेच्या हाती झेलबाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर जडेजाने संजू सॅमसनला शून्यावरच बोल्ड केले. यानंतर बटलरने अश्विनसह संघाची धावसंख्या पुढे नेली. पण 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आकाश सिंहने अश्विनला सिसांडा मगालाच्या हाती झेलबाद केले. यानंतर सतराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीने जोस बटलरला बोल्ड केले. बटलरने 52 धावा केल्या. यानंतर शिमरॉन हेटमायरने ध्रुव जुरेलसोबत चांगली फटकेबाजी केली. मात्र 19 व्या षटकात आकाश सिंहच्या चेंडूवर तो शिवम दुबेच्या हाती झेलबाद झाला. यानंतर पुढच्याच षटकात तुषार देशपांडेने जेसन होल्डरला शून्यावर बाद केले.

अशा पडल्या राजस्थानच्या विकेट

 • पहिलीः दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तुषार देशपांडेने यशस्वी जैस्वालला शिवम दुबेच्या हाती झेलबाद केले.
 • दुसरीः नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रविंद्र जडेजाने देवदत्त पडिक्कलला कॉनवेच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरीः नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रविंद्र जडेजाने संजू सॅमसनला बोल्ड केले.
 • चौथीः पंधराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आकाश सिंहने अश्विनला सिसांडा मगालाच्या हाती झेलबाद केले.
 • पाचवीः सतराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीने जोस बटलरला बोल्ड केले.
 • सहावीः एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आकाश सिंहने ध्रुव जुरेलला शिवम दुबेच्या हाती झेलबाद केले.
 • सातवीः विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तुषार देशपांडेने जेसन होल्डरला डेव्हिड कॉनवेच्या हाती झेलबाद केले.

पॉवर प्लेमध्ये राजस्थानच्या 57 धावा

प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानला दुसऱ्या षटकातच पहिला झटका बसला. त्यांचा ओपनर यशस्वी जैस्वाल 10 धावांवर बाद झाला. तुषार देशपांडेने त्याची विकेट घेतली. यानंतर बटलर व पडिक्कलने राजस्थानचा डाव सावरत पॉवर प्लेमध्ये संघाची धावसंख्या 57 वर नेली.

दुसऱ्या षटकातच राजस्थानला पहिला झटका बसला
दुसऱ्या षटकातच राजस्थानला पहिला झटका बसला

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, महीश तीक्षणा, सिसांडा मगाला, आकाश सिंह आणि तुषार देशपांडे.

इम्पॅक्ट प्लेयर: अंबाती रायुडु, मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद आणि राजवर्धन हंगरगेकर.

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पड्डीकल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन आणि संदीप शर्मा.

इम्पॅक्ट प्लेयर: रियान पराग, केएम आसिफ, डेनोमन फरेरा, अॅडम झंपा आणि जो रूट.

चेन्नईने शेवटचे दोन्ही सामने जिंकले
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर संघाने लखनऊला घरच्या मैदानावर तर मुंबईला मुंबईतच पराभूत केले. अजिंक्य रहाणे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंग धोनी हे संघातील अव्वल खेळाडू आहेत.

रॉयल्स विरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू मोईन अली, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस आणि डेव्हॉन कॉनवे असू शकतात. याशिवाय दीपक चहर आणि बेन स्टोक्स काही सामन्यांसाठी संघाचा भाग असणार नाहीत.

राजस्थानची फलंदाजी डेंजर
पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव केल्यानंतर राजस्थानला पंजाबकडून 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर संघाने पुनरागमन करत दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला. जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर संघाच्या शीर्ष क्रमात चमकदार कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट सातत्याने विकेट घेत आहेत.

चेन्नईविरुद्ध संघाचे 4 परदेशी खेळाडू बटलर, हेटमायर, बोल्ट आणि जेसन होल्डर असू शकतात. याशिवाय सॅमसन, जैस्वाल आणि रविचंद्रन अश्विन हेही संघाला मजबूत करत आहेत.

चेपॉकमधील चेन्नईचा रेकॉर्ड राहिला उत्कृष्ट
चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या होम ग्राउंड चेपॉकवरचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. संघाने येथे गेल्या २० पैकी १७ सामने जिंकले आहेत. केवळ मुंबई इंडियन्सला 3 सामने पराभूत करता आले आहेत. अशा स्थितीत राजस्थानसाठी येथे विजयाची नोंद करणे आव्हान असेल.

CSK हेड टू हेड पुढे आहे
2008 च्या आयपीएल फायनलमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तेव्हा राजस्थानने विजय मिळवला होता, पण एकूण हेड टू हेड रेकॉर्डमध्ये चेन्नई पुढे आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळले गेले आहेत. 15 मध्ये CSK आणि 11 मध्ये RR जिंकले.