आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 3 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर संदीप शर्माने शेवटच्या षटकात 20 धावा देत बचाव केला. राजस्थानकडून जोस बटलरने अर्धशतक केले.
महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधार असताना 200 वा IPL सामना खेळला. ऑफस्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन क्रमांक-5 वर फलंदाजीसाठी आला. सलग दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. तर ऋतुराज गायकवाडला संदीप शर्माच्या बॉलचा फटका बसला. यासह या सामन्यातील टॉप मोमेंट्स घ्या जाणून. तर संपूर्ण सामन्याचा अहवाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
1. धोनीचा 200वा कर्णधार सामना
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या नेतृत्वाखाली 200 वा IPL सामना खेळला. या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 200 व्या सामन्यापूर्वी CSKच्या मालकांनी धोनीला मोमेंटो भेट दिला. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 120 सामने जिंकण्याबरोबरच 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
2. अश्विन फलंदाजीसाठी आला क्रमांक-5
राजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन CSK विरुद्ध क्रमांक-5 वर फलंदाजीसाठी आला. अश्विन सामान्यतः क्रमांक-7 किंवा क्रमांक-8 वर फलंदाजी करतो. या संधीचा फायदा घेत अश्विनने 22 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 30 धावा केल्या.
अश्विनने यापूर्वी 2022 आणि 2014 मध्ये आयपीएलमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. 2014 मध्ये त्याने 16 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, गेल्या वर्षी सीएसकेविरुद्ध त्याने 23 चेंडूत 40 धावा केल्या होत्या.
3. सॅमसनचे सलग दुसरे डक
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजाने 9व्या षटकातील पाचवा चेंडू मधल्या स्टंपवर गुड लेंथवर टाकला. चेंडू वळला आणि स्टंपला लागला. सॅमसनचे हे सलग दुसर डक होते.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात सॅमसनला खातेही उघडता आले नव्हते. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाने देवदत्त पदीकल यालाही झेलबाद केले.
4. संदीप शर्माचा बॉल लागला ऋतूराजला
दुसऱ्या डावातील पहिले षटक राजस्थानच्या संदीप शर्माने टाकले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर संदीपने लेगस्टंपवर छोटा चेंडू टाकला, पण ऋतुराज गायकवाड हा चेंडू खेळायला तयार नव्हता. गायकवाड खूप उशिरा निघाला त्यातच चेंडू त्याच्या दिशेने आला. गायकवाडने हात वर केला, पण बॉल त्याला जोरदार लागला. यावेळी गायकवाड याने खातेही उघडले नव्हते. तो 8 धावा करून संदीप शर्माच्या चेंडूवर कॅचआऊट झाला.
5. रहाणे-अश्विनमध्ये गोंधळ
दुसऱ्या डावात सीएसकेचा अजिंक्य रहाणे आणि राजस्थान रॉयल्सचा रविचंद्रन अश्विन यांच्यात बाचाबाची झाली. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने चेंडू फेकण्यापूर्वीच त्याला थांबवले. यानंतर अश्विन गोलंदाजी करण्यापूर्वी अजिंक्य रहाणे थांबला. त्याच षटकात रहाणेने षटकार मारला. अखेरीस रहाणेने 19 चेंडूत 31 धावा केल्या आणि अश्विनच्या चेंडूवर तो LBW झाला.
6. शेवटच्या षटकात CSK अवघ्या तीन धावांनी पराभू
175 धावांच्या लक्ष्यासमोर CSK ला शेवटच्या 18 चेंडूत 54 धावांची गरज होती. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजाने 18व्या षटकात 14 धावा केल्या. 19व्या षटकात जडेजाने 2 षटकार ठोकत 19 धावा केल्या.
शेवटच्या षटकात 21 धावांची गरज असताना धोनीने षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. मात्र संदीप शर्माने पुढच्या 3 चेंडूत केवळ 3 धावा देत संघाला विजय मिळवून दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.