आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 चा 7 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) दिल्ली कॅपिटल्सवर 6 गड्यांनी मात केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात दिल्लीने दिलेले 163 धावांचे आव्हान गुजरातने 18.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 62 धावा केल्या. त्याला विजय शंकर (29 धावा) आणि डेव्हिड मिलरने (31 धावा) चांगली साथ दिली. गुजरातचे शुभमन गिल, वृद्धिमान साहा आणि हार्दिक पंड्या हे तिघेही सुरुवातीला स्वस्तात आऊट झाले होते. त्यानंतर साई सुदर्शन व विजय शंकरने गुजरातचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र मिचेल मार्चने ही जोडी फोडत विजयला पायचित केले.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
आधी पहा गुजरातचे मॅच विनर्स...
अशा पडल्या गुजरातच्या विकेट
पॉवर प्लेदरम्यान कडवी टक्कर
दुसऱ्या डावातील पॉवर प्लेदरम्यान दोन्ही संघांत कडवी झुंज बघायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये गुजरातच्या फलंदाजांनी 54 धावा केल्या. तर दिल्लीच्या गोलंदाजांनी गुजरातला तीन झटके दिले. कर्णधार पंड्या 5, शुभमन गिल व वृद्धिमान साहा 14-14 धावा करून आऊट झाले. एनरिक नोर्त्यान 2 आणि खलील अहमदने 1 विकेट घेतली.
दिल्लीच्या 162 धावा, शमी-राशीदच्या 3-3 विकेट
गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीने 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार वॉर्नरने सर्वाधिक 37 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने 36, सरफराज खानने 30, तर अभिषेक पोरेलने 20 धावा केल्या.
गुजरातकडून मोहम्मद शमी व राशीद खानने प्रत्येकी 3 बळी घेतले. तर अल्झारी जोसेफने 2 विकेट घेतल्या.
दिल्लीचा डाव
दिल्लीला तिसऱ्या षटकातच पहिला झटका बसला. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ 7 धावांवरच बाद झाला. शमीने त्याची विकेट घेतली. पृथ्वीनंतर मैदानावर आलेला मिचेल मार्चही 4 धावा काढून बाद झाला. त्याची विकेटही शमीनेच घेतली. शमीने त्याला बोल्ड केले. दोन विकेट गेल्यानंतर मैदानावर एकीकडून खिंड लढवणारा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर 37 धावांवर बाद झाला. तर त्यानंतर आलेला रिले रुसोही पुढच्याच चेंडूवर बाद झाला. दोघांचीही विकेट जोसेफनेच घेतली. यानंतर दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा अभिषेक पोरेल राशीदच्या एका चेंडूवर बोल्ड झाला. यानंतर मैदानावर फटकेबाजी करत दिल्लीचा धावफलक पुढे नेणाऱ्या सरफराजला राशीदने जोशुआ लिटलच्या हाती झेलबाद केले.
पॉवर प्लेमध्ये शमीला 2 विकेट
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सला मोहम्मद शमीने चांगली सुरुवात मिळवून दिली. त्याने पृथ्वी शॉला झेलबाद केल्यानंतर मिचेल मार्शला बोल्ड केले. सुरुवातीच्या झटक्यानंतर डेव्हिड वॉर्नरने कमान सांभाळली आणि संघाला पन्नाशीपार घेऊन गेला.
अशा पडल्या दिल्लीच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग-11...
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, राशिद खान, डेव्हिड मिलर, जेशुआ लिटल, यश दयाल आणि अल्झारी जोसेफ.
प्रभावशाली खेळाडू : केएस भरत, शिवम मावी, मोहित शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, मिचेल मार्श, रिले रुसो, सरफराज खान (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद आणि एनरिक नॉर्त्या.
प्रभावशाली खेळाडू: ललित यादव, मुकेश कुमार, अमन खान.
पहिला सामना गमावल्यानंतर दिल्लीचे लक्ष यंदाच्या मोसमात पुनरागमन करण्यावर असेल. त्याचबरोबर मोसमातील पहिल्या विजयानंतर गुजरातचे इरादे मजबूत आहेत. लीगच्या इतिहासात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत.
केन विल्यमसन गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. असे असूनही गुजरातला त्याचा फारसा फरक पडणार नाही कारण आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर उपलब्ध असेल. लुंगी एनगिडी आणि एनरिक नॉर्त्या हे देखील दिल्ली कॅम्पमध्ये सामील झाले आहेत.
गुजरातने विजयाने सुरुवात केली
गतविजेत्या गुजरातने मोसमाची सुरुवात विजयाने केली. या संघाने घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर शुभमन गिल आणि राशिद खान यांनी चांगली कामगिरी केली होती. DC विरुद्ध संघातील 4 परदेशी खेळाडू जोश लिटल, डेव्हिड मिलर, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ असू शकतात. याशिवाय हार्दिक पंड्या, शुभमन गिल, यश दयाल आणि मोहम्मद शमी सारखे अव्वल दर्जाचे भारतीय खेळाडूही संघाला मजबूत करत आहेत.
दिल्लीचा पहिल्या सामन्यात पराभव
दिल्ली कॅपिटल्ससाठी स्पर्धेतील सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिल्या सामन्यात लखनऊविरुद्ध ५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. संघाला तो पराभव विसरून या सामन्यावर लक्ष केंद्रित करायला आवडेल.
GT विरुद्ध, संघाचे 4 विदेशी खेळाडू डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिक नॉर्त्या आणि रोव्हमन पॉवेल असू शकतात. याशिवाय पृथ्वी शॉ, चेतन साकारिया आणि अक्षर पटेल हे भारतीय खेळाडूही संघाला मजबूत करत आहेत.
दिल्लीला गुजरातकडून मागील पराभवाचा बदला घ्यायचा
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा हा केवळ दुसरा हंगाम आहे. पहिल्या सत्रात या संघाने अव्वल स्थान पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर साखळी फेरीत दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले होते. तो सामना गुजरातने जिंकला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.