आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 50 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. दिल्लीने 16.4 षटकांत 3 गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले.
सॉल्टच्या तडाखेबंद 87 धावा
दिल्लीकडून फिलिप सॉल्टने सर्वाधिक 87 धावा केल्या. त्यानंतर रिले रुसोने 35, मिशेल मार्शने 26, डेव्हिड वॉर्नरने 22 धावा केल्या. बंगळुरूकडून जोश हेझलवूड, हर्षल पटेल आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दिल्लीचा डाव
या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली. दिल्लीचा ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्टने पहिल्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात डेव्हिड वॉर्नरला 22 धावांवर बाद करत जोश हेझलवूडने ही भागीदारी मोडली. त्यानंतर सॉल्ट आणि मिशेल मार्शने डाव पुढे नेत दुसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. मार्शला 26 धावांवर बाद करत अकराव्या षटकात अक्षर पटेलने ही भागीदारी मोडली. दरम्यान सॉल्टने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सॉल्ट आणि रिले रुसोने संघाला विजयाच्या जवळ नेले. विजयासाठी अवघ्या 11 धावांची गरज असताना सोळाव्या षटकात कर्ण शर्माने फिलिप सॉल्टला 87 धावांवर बाद केले. त्यानंतर अक्षर पटेल आणि रिले रुसोने संघाला विजयी धावसंख्या गाठून दिली.
पाहा सामन्याचे लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या दिल्लीच्या विकेट
कोहली-लोमरोरची फिफ्टी
बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्यानंतर महिपाल लोमरोरने 54, फाफ डु प्लेसिसने 45, दिनेश कार्तिकने 11 धावा केल्या. तर दिल्लीकडून मिशेल मार्शने 2, खलील अहमद व मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बंगळुरूचा डाव
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूला ओपनर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठई 82 धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात फाफ डु प्लेसिसला 45 धावांवर बाद करत मिशेल मार्शने ही जोडी फोडली. मार्शने नंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेल यालाही शून्यावर बाद केले. यानंतर विराटने लोमरोरच्या साथीने डाव पुढ नेला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केली. सोळाव्या षटकात विराटला 55 धावांवर बाद करत मुकेश कुमारने ही जोडी फोडली. त्यानंतर लोमरोरने दिनेश कार्तिकसह डाव पुढे नेला. मात्र दिनेश कार्तिक विसाव्या षटकात 11 धावांवर बाद झाला. खलील अहमदने त्याची विकेट घेतली. अखेर लोमरोर आणि अनुज रावतने 20 षटकांत संघाची धावसंख्या 181 वर पोहोचवली.
अशा पडल्या बंगळुरूच्या विकेट
प्लेऑफसाठी दिल्लीला विजय आवश्यक
दिल्ली कॅपिटल्स सध्या 9 सामन्यांत 3 विजय मिळवून 6 गुणांसह गुणतालिकेत तळाला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी संघाला उर्वरित सर्व 5 सामने जिंकावे लागतील. अशा परिस्थितीत त्यांचा आज पराभव झाला तर त्यांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खूपच कठीण होईल.
दिल्लीने मागील सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. बंगळुरूविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अॅनरिक नॉर्थ्या आणि फिलिप सॉल्ट असू शकतात.
RCB विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल
बंगळुरू संघ 9 सामन्यांत 5 विजय आणि 4 पराभवानंतर 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. आज जिंकल्यास, संघ 12 गुणांसह गुजरात टायटन्सनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. पण जर ते हरले तर त्यांना त्यांच्या शेवटच्या 4 पैकी 3 सामने जिंकावे लागतील, तरच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील.
अखेरच्या सामन्यात बंगळुरूने लखनऊविरुद्ध 126 धावांचा बचाव करत 18 धावांनी विजय मिळवला. दिल्लीविरुद्ध संघाचे चार विदेशी खेळाडू कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि जोस हेझलवूड असू शकतात.
हेड टू हेड
दोन्ही संघ मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. यापूर्वी बंगळुरूमध्ये आरसीबीने दिल्लीचा २३ धावांनी पराभव केला होता. एकूणच आयपीएलमधील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये आरसीबीने 18 आणि डीसीने 10 जिंकले, एक सामनाही अनिर्णित राहिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.