आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 44 वा सामना गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावा करत गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकांत 6 गडी गमावून 125 धावाच करता आल्या.
हार्दिकची झुंजार खेळी व्यर्थ
गुजरातकडून हार्दिकने 59 धावांची झुंजार खेळी केली. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यानंतर अभिनव मनोहरने 26, राहुल तेवतियाने 20 धावा केल्या.दिल्लीकडून खलील अहमदने आणि ईशांत शर्माने प्रत्येकी 2, तर एन्रिक नॉर्त्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरातचा डाव
या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवातही खराब झाली. गुजरातचा ओपनर वृद्धिमान साहा पहिल्या षटकात शून्यावर बाद झाला. खलील अहमदने त्याची विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या षटकात नॉर्त्याने शुभमन गिलला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर ईशांत शर्माने पाचव्या षटकात विजय शंकरला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर सातव्या षटकात कुलदीप यादवने डेव्हिड मिलरला शून्यावर बाद केले. एकीकडून एकेक फलंदाज बाद होत असताना हार्दिक पंड्याने एक बाजू लावून धरली. पाचव्या गड्यासाठी त्याने अभिनव मनोहरसह 62 धावांची भागीदारी केली. यादरम्यान हार्दिकने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. अठराव्या षटकात अभिनव मनोहरला 26 धावांवर बाद करत खलील अहमदने ही जोडी फोडली. यानंतर हार्दिक पंड्या आणि राहुल तेवतियाने संघाची धावसंख्या पुढे नेली. मात्र शेवटच्या षटकात तेवतिया 20 धावांवर बाद झाला. ईशांत शर्माने त्याची विकेट घेतली. अखेर 20 षटकांत गुजरातला 125 धावाच करता आल्या.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या गुजरातच्या विकेट
अमन खानचे अर्धशतक
दिल्लीकडून अमन खानने सर्वाधिक 51 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने 27, रिपल पटेलने 23, प्रियम गर्गने 10 धावे केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने 4, मोहित शर्माने 2, तर राशिद खानने 1 विकेट घेतली.
दिल्लीचा डाव
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर फिलिप सॉल्ट पहिल्या चेंडूवरच बाद झाला. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या षटकात राशिद खानने डेव्हिड वॉर्नरला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर शमीने तिसऱ्या षटकात रिले रुसोला 8 धावांवर, पाचव्या षटकात मनीष पांडेला 1 धावेवर, त्याच षटकात प्रियम गर्गला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर अक्षर पटेल आणि अमन खानने संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. चौदाव्या षटकात अक्षर पटेलला 27 धावांवर बाद करत मोहित शर्माने ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या रिपल पटेलने जोरदार फटकेबाजी करत अमनला साथ दिली. या दोघांनीही सातव्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळीने संघाचा डाव सावरणारा अमन खान एकोणिसाव्या षटकात 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर विसाव्या षटकात रिपल पटेलही 23 धावांवर बाद झाला. दिल्लीला 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावाच करता आल्या.
अशा पडल्या दिल्लीच्या विकेट
अमन-अक्षर-रिपलने सावरला डाव
23 धावांत अर्धा संघ गारद झाल्यावर अक्षर पटेल आणि अमन खानने संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. चौदाव्या षटकात अक्षर पटेलला 27 धावांवर बाद करत मोहित शर्माने ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या रिपल पटेलने जोरदार फटकेबाजी करत अमनला साथ दिली. या दोघांनीही सातव्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळीने संघाचा डाव सावरणारा अमन खान एकोणिसाव्या षटकात 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर विसाव्या षटकात रिपल पटेलही 23 धावांवर बाद झाला.
दिल्लीचा अर्धा संघ 23 धावांत गारद
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर फिलिप सॉल्ट पहिल्या चेंडूवरच बाद झाला. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या षटकात राशिद खानने डेव्हिड वॉर्नरला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर शमीने तिसऱ्या षटकात रिले रुसोला 8 धावांवर, पाचव्या षटकात मनीष पांडेला 1 धावेवर, त्याच षटकात प्रियम गर्गला 10 धावांवर बाद केले. दिल्लीचे 5 फलंदाज केवळ 23 धावांतच बाद झाले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11...
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.
इम्पॅक्ट प्लेयर्स : शुभमन गिल, साई किशोर, श्रीकर भरत, साई सुदर्शन, शिवम मावी.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिले रुसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एन्रिक नॉर्त्या, इशांत शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स : खलील अहमद, ललित यादव, यश धूल, प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल.
गुजरातने केवळ 2 सामने गमावले
गतविजेता गुजरात टायटन्स स्पर्धेतील 8 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. संघाने आतापर्यंत फक्त कोलकाता आणि राजस्थानविरुद्ध 2 सामने गमावले आहेत. दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर विजयाची नोंद करून संघ पहिल्या स्थानावर आपले स्थान मजबूत करू शकतो.
दिल्लीविरुद्ध त्यांचे चार परदेशी खेळाडू राशिद खान, नूर अहमद, जोशुआ लिटल आणि डेव्हिड मिलर असू शकतात. साई सुदर्शनने मोसमातील शेवटच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध अर्धशतक ठोकले होते, पण त्याची निवड करण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्याला विजय शंकर किंवा अभिनव मनोहर यापैकी एकाला संघातून बाहेर बसवावे लागेल.
दिल्लीचा मिचेल मार्श फॉर्ममध्ये परतला
दिल्लीने स्पर्धेची सुरुवात सलग 5 सामने गमावून केली, पण त्यानंतर 2 सामने जिंकले. हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मिचेल मार्शने 4 विकेट घेत अर्धशतक केले होते. पण संघाने 9 धावांनी सामना गमावला. आता प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी दिल्लीला उर्वरित 6 सामने जिंकावे लागतील. एकही सामना गमावल्यास संघाला उर्वरित संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
गुजरातविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अॅनरिक नॉर्टया आणि फिलिप सॉल्ट असू शकतात. संघ पुन्हा एकदा प्रियम गर्गला मधल्या फळीत संधी देऊ शकतो आणि अक्षर पटेलच्या वर फलंदाजीला पाठवू शकतो.
दिल्लीला गुजरातकडून एकही सामना जिंकता आलेला नाही
गुजरात टायटन्स गेल्या वर्षीच आयपीएलमध्ये सामील झाला होता. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, जो टायटन्सने जिंकला. या मोसमातही या दोघांमध्ये एक सामना झाला असून त्यातही दिल्लीचा पराभव झाला आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.