आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलमध्ये रविवारी गुजरात टायटन्सने लखनऊ सुपरजायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लखनऊने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 2 बाद 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊच्या फलंदाजांना 20 षटकांत 7 गडी बाद 171 धावाच करता आल्या. या सामन्यात नाणेफेकीदरम्यान पंड्या बंधू पुन्हा एकत्र दिसले. त्याचवेळी राशीदने अप्रतिम स्लाइडिंग झेल घेतला. चला तर जाणून घेऊया, या सामन्यातील टॉप मोमेंट्स...
टॉसच्या वेळी आमनेसामने आले पंड्या बंधू
नाणेफेक दरम्यान पंड्या ब्रदर्स म्हणजेच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या समोरासमोर दिसले. वास्तविक, केएल राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल लखनऊचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्यामुळेच नाणेफेकीच्या वेळी कृणाल लखनऊ टीमकडून आला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भावांनी एका सामन्यात एकमेकांच्या विरोधात नेतृत्व केले आहे. नाणेफेकीनंतर पंड्या बंधूंनीही एकमेकांनास जोरदार मिठी मारली.
कृणाल पंड्याने घेतला हार्दिकचा झेल
16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिक पंड्याने मोहसीनच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह मारला. हार्दिक पंड्याने 122 किमी प्रतितास वेगाने स्लो बॉलवर कव्हरच्या दिशेने दमदार शॉट खेळला. कव्हरवर त्याचा भाऊ कृणाल पंड्या उभा होता. 152 च्या वेगाने चेंडू त्याच्याकडे आला आणि 0.9 सेकंदात त्याने हार्दिकचा शानदार झेल घेतला.
राशीदने चौथ्या षटकात मेयर्सचा कॅच सोडला तर पुन्हा नवव्या षटकात कॅच घेतला
गुजरात संघाचा राशिद खानने लखनऊचा खेळाडू काईल मेयर्सचा पहिला झेल सोडला. यानंतर नवव्या षटकात त्याचा झेल पकडून त्याला बाद केले. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर काइल मेयर्सने हार्दिक पंड्याच्या चेंडूवर हवेत शॉट मारला. पण, राशीदने त्याचा झेल सोडला. यानंतर मोहित शर्माच्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मेयर्सने पुल शॉट खेळला. फिल्डिंग करताना रशीदने 26 मीटर अंतरावरून धावत येऊन एक शानदार स्लाइडिंग झेल घेतला.
आता पाहा सामन्याशी संबंधित काही फोटोज...
हे ही वाचा
RR Vs SRH सामन्याचे मोमेंट्स:संदीप शर्माचा शेवटचा चेंडू नो-बॉल, त्याच चेंडूवर समदच्या षटकाराने हैदराबादचा विजय
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला. चढ-उतारांनी भरलेल्या सामन्याच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये हैदराबादला विजयासाठी 41 धावांची गरज होती. ग्लेन फिलिप्सने 19व्या षटकात 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.