आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. दोघेही मैदानातच एकमेकांवर भिडले. वाद वाढत असल्याचे पाहून एलएसजीचा कर्णधार केएल राहुल आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा यांनी मध्यस्थी करून प्रकरण हाताळले.
लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी रात्री झालेल्या सामन्यानंतर दोन वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. हा वाद नेमका मॅच संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते. त्याचवेळी झाला. दरम्यान, कोहली-गंभीर यांच्यातील संघर्षाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होऊ लागले आहेत.
या वादानंतर, LSG मार्गदर्शक गौतम गंभीर आणि माजी RCB कर्णधार विराट कोहली यांना IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. एलएसजीचा गोलंदाज नवीन-उल-हकलाही त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहली आणि नवीनने आपली चूक मान्य केलेली आहे.
वाद होण्यापूर्वी बंगळुरूने त्यांच्या घरच्या मैदानावर लखनऊचा 18 धावांनी पराभव करून मागील पराभवाचा बदला घेतला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात केएल राहुल दुखापत झाल्यानंतर 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. नवीन उल-हकने फाफ डू प्लेसिसचा सोपा कॅच सोडला. तसेच विराटची पत्नी अनुष्का शर्मा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील सामना पाहण्यासाठी लखनऊला पोहोचली. या सामन्यातील टॉप मोमेंट्स या बातमीत जाणून घेणार आहोत. - सामन्याचा अहवाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
विराट कोहली व गौतम गंभीर मैदानावर का भिडले?
सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीचा लखनऊचा अफगाण गोलंदाज नवीन-उल-हकसोबत वाद झाला. त्यावेळी नवीन-उल-हक फलंदाजी करत होता, वादानंतर नवीनने षटकारही मारला, पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केल्यानंतर एलएसजीचा सलामीवीर काइल मेयर्स कोहलीशी संवाद साधताना दिसला. त्यानंतर एलएसजीचा मेंटर गौतम गंभीरने मेयर्सला कोहलीपासून दूर नेले. गंभीर जेव्हा त्याला कोहलीपासून वेगळे करत होता, तेव्हा गंभीर आणि कोहलीमध्ये वाद सुरू झाला. एकमेकांपासून दूर जात असतानाही दोघे वाद घालत होते. काही वेळाने दोन्ही खेळाडू जवळ आले आणि एकमेकांना काहीतरी बोलू लागले.
सुमारे 5 मिनिटे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद वाढतच असल्याचे पाहून जवळच उभा असलेले वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा आणि केएल राहुल यांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही कोहली आणि गंभीर एकमेकांवर चिडलेले दिसून आले.
मागील सामन्यातील गंभीरच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून चाहतेही या वादाचा विचार करू लागले आहेत. जेव्हा लखनऊने बंगळुरूविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सामना संपल्यानंतर गंभीरने प्रेक्षकांना शांत राहण्याचे संकेत दिले. अशा स्थितीत आजच्या सामन्यादरम्यान कोहलीने चाहत्यांना गप्प न बसण्याचे संकेत दिले. तो आवाज काढताना आणि संघांना पाठिंबा देण्यासाठी इशारा करतानाही दिसला.
2. नवीनने डु प्लेसिसचा झेल सोडला
सामन्याच्या पहिल्या डावातील दुसऱ्या षटकात स्टॉइनिस गोलंदाजी करत होता. फाफ डु प्लेसिस स्ट्राइकवर होता. मार्कस स्टॉइनिसच्या तिसऱ्या चेंडूवर डू प्लेसिसने मिड-ऑनच्या दिशेने शॉट खेळला, चेंडू हवेत गेला. नवीन-उल-हकने झेल घेण्यासाठी डायव्ह केले, पण चेंडू त्याच्या हातापर्यंत पोहोचला नाही आणि झेल चुकला. डू प्लेसिस सध्या १० पेक्षा कमी धावांवर फलंदाजी करत होता, त्याने सामन्यात ४४ धावांची खेळी खेळली होती.
3. केएल राहुल जखमी
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल या सामन्यादरम्यान जखमी झाला. बंगळुरूच्या डावात दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या पायाला दुखापत झाली. चेंडूनंतर त्याने धावणे थांबवले. त्याला पाहण्यासाठी लखनऊची फिजिओ टीम मैदानावर आली अखेर राहुलला मैदानाबाहेर नेण्यात आले.
4. कोहलीने दिला फ्लाइंग किस
बंगळुरूचा संघ पहिल्या डावात केवळ 126 धावाच करू शकला. दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आक्रमक अवस्थेत दिसला. त्याने सामन्यात 2 झेल घेतले आणि लखनऊच्या प्रत्येक विकेटवर तो प्रेक्षकांना फ्लाइंग किस देताना दिसला.
5. चाहत्याने कोहलीचे घेतले दर्शन
दुसऱ्या डावातील सातव्या षटकानंतर एक चाहता धावत विराट कोहलीकडे आला, त्याच्या पाया पडला. विराट त्यांना दूर जाण्यास सांगू लागला. शेवटी सुरक्षा रक्षकांनी फॅनला मैदानातून बाहेर काढले.
पाहा सामन्यातील महत्त्वाचे फोटो
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.