आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये वेळेचे बंधन पाळले जात नाही:10.50 वाजता संपणारा सामना 11.30 पर्यंत लांबत आहे, ब्रॉडकास्टरचे होत आहे नुकसान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरुवातीच्या 7 सामन्यांत एकही डाव ठरवलेल्या वेळेत संपला नाही. मुंबई इंडियन्सविरोधात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावर एका तासात 14 ऐवजी केवळ 10 षटकेच टाकली.

जलदगती क्रिकेट अशी टी-20 ची ओळख आहे. मात्र या फॉर्मॅटची मेगा टुर्नामेंट IPL चा वेग मंदावला आहे. प्रेक्षकांना निकालासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे आणि खेळाडूही यामुळे त्रस्त होत आहे. अलिकडेच चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंटसच्या सामन्यादरम्यान जोस बटलरने सोशल मीडियावर लिहिले की, कृपया या खेळाचा वेग वाढवा.

वास्तविक, सामन्याचा पहिला डाव 1 तास आणि 48 मिनिटांत संपला. सामान्यपणे डाव संपण्याचा ठरलेला कालावधी 1 तास 30 मिनिटांचा आहे. हा कालावधी बघायला कमी वाटतो, मात्र सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणारा सामना रात्री 11.30 पर्यंत संपला. विशेष म्हणजे ही एका सामन्याचीच कहाणी नाही.

सध्याच्या आयपीएल हंगामात कोणताही डाव निश्चित वेळेत संपला नाही. निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ सामने खेचले जात आहेत. नियमांनुसार सामना 3 तास 20 मिनिटांत संपायला हवा. असे न झाल्याने अधिकृत ब्रॉडकास्टरचे आर्थिक नुकसान होत आहे. गुजरात आणि चेन्नईदरम्यान अहमदाबादमध्ये खेळला गेलेला ओपनिंग सामना तर 4 तासांपेक्षा जास्त वेळ चालला होता.

सर्व डाव 100 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालले

सामनाडाव-1डाव-2
गुजरात-चेन्नई120103
पंजाब-कोलकाता10386
लखनऊ-दिल्ली107112
हैदराबाद-राजस्थान107112
बंगळुरू-मुंबई122

78

चेन्नई-लखनऊ108112
दिल्ली-गुजरात111107

ओपनिंग सेरेमनी-कुत्र्यामुळे विलंब, दंडही झाला नाही

आयसीसीनुसार एका तासात सुमारे 14 षटके टाकणे गरजेचे असते. आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेट नेहमीपासूनच चिंतेचा विषय राहिला आहे. याचे निराकरण करण्यासाठी गेल्या वर्षी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार जर 90 मिनिटांत 20 षटके पूर्ण झाली नाही तर उर्वरित षटकांत 5 ऐवजी 4 खेळाडूच 30 यार्डाच्या बाहेर ठेवता येतील. याचा फायदा बॅटिंग टीमला मिळतो आणि फलंदाज लॉन्ग शॉट खेळू शकतो.

तथापि, सध्याच्या हंगामात हा दंड केवळ सीएसकेला लखनऊविरोधातील सामन्यात झाला आहे. इतर सामन्यांत अंपायर्सना संघाला दंड ठोठावण्यासाठी ठोस कारण मिळाले नाही. त्यांच्यानुसार स्लो ओव्हर रेटचे कारण डीआरएसचा वेग कमी असणे इ. असू शकतात. उदाहरण म्हणून उद्घाटनाचा सामना ओपनिंग सेरेमनीमुळे 2 मिनिटे उशीरा सुरू झाला. तर चेन्नई-लखनऊचा सामना मैदानावर आलेल्या कुत्र्यामुळे 5 मिनिटे उशीराने सुरू झाला होता.

90 मिनिटांत 20 षटकांचा नियम, बंगळुरूने 122 मिनिटे घेतली

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात 20 षटकांचा कोणताही डाव निश्चित वेळेत संपला नाही. नियमांनुसार 20 षटके 90 मिनिटांत टाकायची असतात. यात डावादरम्यान घेतला जाणारा 5 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आऊट ब्रेकही समाविष्ट असतो. मात्र, 2 एप्रिलला मुंबई-बंगळुरू सामन्यात मुंबई इंडियन्सचा डाव हंगामात सर्वात जास्त वेळ चालला.

आयपीएल मॅच 30 मिनिटे लवकर केल्या, तरीही फायदा नाही, प्रेक्षकांना रात्री उशीरापर्यंत सामना बघण्यात रस नाही

आयपीएलचा सामना उशीरा संपल्याने ब्रॉडकास्टरला नुकसान होते. अधिकृत ब्रॉडकास्टरनुसार रात्री 10.45 नंतर टीव्ही रेटिंग कमी व्हायला लागते. तर 11 वाजेनंतर यात वेगाने घट होते. प्रेक्षक रात्री उशीरापर्यंत सामने बघत नाही हे यामागील कारण आहे. यामुळे आयपीएल सामन्यांचा कालावधी रात्री 8 वाजेवरून 7.30 करण्यात आला होता. मात्र यानेही फायदा होत नाही.

ही बातमीही वाचा...

IPL-2023 चे रंग:CSK च्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन श्रीकांत यांनी धोनीला दिला आशीर्वाद, VIDEO इंटरनेटवर व्हायरल