आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या 16 व्या हंगामातील सुपर संडेचा दुसरा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. तिलकच्या खेळीच्या जोरावर मुंबईने उभारलेले 172 धावांचे आव्हान बंगळुरूने 16.2 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर कर्णधार विराट कोहली व फाफ डु प्लेसिसच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर आरसीबीने चांगली सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. आरसीबीची पहिली विकेट पंधराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फाफच्या रुपाने पडली आरसीबीचा ओपनर फलंदाज फाफ 73 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला कार्तिकही लगेच शून्यावर बाद झाला. त्यानंतर कोहलीने मॅक्सवेलच्या साथीने उरलेले आव्हान पूर्ण करत षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
अशा पडल्या बंगळुरूच्या विकेट
मुंबईचा हिरो ठरला तिलक
मुंबईचा संपूर्ण संघ 100 धावांच्या आतच बाद होतो की काय अशी स्थिती असताना तिलक वर्माने एकट्याने खिंड लढवत संघाचा डाव सावरला. तिलक वर्माने सुरुवातीला संयमी आणि नंतर दमदार खेळी करत 84 धावा केल्या. तिलकच्या याच धावांच्या जोरावर मुंबईने बंगळुरूसमोर 172 धावांचे आव्हान उभे केले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात तिलकने मुंबईचे आव्हान कायम ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. तत्पूर्वी आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
तिलकचे खिंड लढवत अर्धशतक
सुरुवातीपासूनच गडगडलेल्या मुंबईच्या डावाला तिलक वर्माने एकट्याने खिंड लढवत आकार दिला. त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली. एकीकडे एक एक खेळाडू बाद होत असताना तिलकने दुसरी बाजू संयमीपणे टिकवून धरली. शेवटच्या षटकांत मोठे फटके खेळून त्याने मुंबईच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सामन्याच्या पहिल्या डावात तिलक मुंबईचा हिरो ठरला आहे.
मुंबईचा डाव
मुंबईने आधी फलंदाजी करताना 20 षटकांत 7 विकेट गमावून 171 धावा केल्या. तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 84 धावा केल्या. त्याचा हा आयपीएल कारकिर्दीतील सर्वात मोठा स्कोअर आहे. तिलकचे हे तिसरे अर्धशतक आहे. निहाल वधेराने 21 धावा केल्या. तर ईशान किशनने 10, कॅमेरूनने 5, रोहितने 1 तर सूर्यकुमार यादवने 15 धावा केल्या.
कर्ण शर्माने आरसीबीला दोन विकेट मिळवून दिल्या. सिराज, टफली, आकाश दीप, हर्षल व मायकल ब्रेसवेलने प्रत्येकी एक बळी घेतला.
मुंबईची टॉप ऑर्डर फ्लॉप
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. ओपनर रोहित शर्मा 1, ईशान किशन 10 आणि कॅमेरून ग्रीन 5 व सूर्यकुमार यादव 15 धावांवरच बाद झाले.
पॉवर प्लेमध्येच गमावल्या 3 विकेट
टॉस हरल्यानंतर आधी बॅटिंगला उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब राहिली. टीमला तिसऱ्या षटकातच ईशान किशनची विकेट गमवावी लागली. पुढच्याच षटकात ग्रीनही बाद झाला आणि पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टीमचा कर्णधार रोहित शर्माही बाद झाला. मुंबईने 6 षटकांतच 3 विकेट गमावल्या.
अशा पडल्या मुंबईच्या विकेट
गेल्या दोन हंगामात (2022 आणि 2021) मुंबईला बंगळुरूविरुद्ध सलग तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे.
दोन्ही संघातील प्लेइंग-11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, फिन ऍलन, महिपाल लोमरोर, अनुज रावत, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रीस टॉप्ले, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.
प्रभावशाली खेळाडू: आकाश दीप, कर्ण शर्मा आणि सुयश प्रभुदेसाई.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, हृतिक शोकीन, कुमार कार्तिकेय, जोफ्रा आर्चर, अर्शद खान आणि जेसन बेहरनडॉर्फ.
प्रभावशाली खेळाडू: संदीप वारियर, रमणदीप सिंग आणि शम्स मुलानी.
आयपीएलची ही बातमीही वाचा...
IPL सुपर संडे:RR ची SRH वर 72 धावांनी मात; हैदराबादचा 131 धावांतच खुर्दा; चहलचे 4 बळी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.