आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 61 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) 6 गड्यांनी विजय मिळवला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेले 145 धावांचे आव्हान कोलकाताने 18.3 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
नितीश-रिंकूची फिफ्टी
कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक 57 धावा केल्या, तर रिंकू सिंहने 54, जेसन रॉयने 12 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने 3, मोईन अलीने विकेट घेतल्या. तत्पूर्वी चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 6 गडी गमावून 144 धावा करत कोलकाताला विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले.
कोलकाताचा डाव
याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर रहमानुल्लाह गुरबाज पहिल्याच षटकात 1 धावेवर आऊट झाला. दीपक चहरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर चहरने तिसऱ्या षटकात व्यंकटेश अय्यरलाही 9 धावांवर बाद केले. तर त्यानंतर चहरनेच पाचव्या षटकात जेसन रॉयलाही 12 धावांवर बाद केले. यानंतर रिंकू सिंह आणि नितीश राणाने डाव पुढे नेत चौथ्या गड्यासाठी 99 धावांची भागीदारी केली. अठराव्या षटकात रिंकू सिंह 54 धावांवर धावबाद झाल्यावर ही जोडी फुटली. त्यानंतर नितीश राणा आणि आंद्रे रसेलने संघाला विजयी धावसंख्या गाठून दिली.
पाहा सामन्याचे लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या कोलकाताच्या विकेट
दुबेच्या 48 धावा
चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक नाबाद 48 धावा केल्या. त्यानंतर डेवॉन कॉनवेने 30, रविंद्र जडेजाने 20, ऋतुराज गायकवाडने 17 आणि अजिंक्य रहाणेने 16 धावा केल्या. तर कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायणने प्रत्येकी 2, तर वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
चेन्नईचा डाव
चेन्नईला ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेने चांगली सुरूवात करून दिली. मात्र ऋतुराज 17 धावांवर असताना वरुण चक्रवर्तीने त्याची विकेट घेतली. त्यानंतर चक्रवर्तीने आठव्या षटकात अजिंक्य रहाणेला 16 धावांवर बाद केले. तर दहाव्या षटकात शार्दुल ठाकूरने डेवॉन कॉनवेला 30 धावांवर बाद केले. तर अकराव्या षटकात सुनील नारायणने अंबाती रायुडूला 4 आणि मोईन अलीला 1 धावेवर बाद केले. यानंतर जडेजा आणि दुबेने डाव सावरत सहाव्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. विसाव्या षटकात वैभव अरोराने रविंद्र जडेजाला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर दुबे आणि धोनीने संघाची धावसंख्या 144 वर नेली.
अशा पडल्या चेन्नईच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग 11...
कोलकाता नाईट रायडर्स: नितीश राणा (कप्तान), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर्स: व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, एन जगदीशन, उमेश यादव आणि लॉकी फर्ग्यूसन.
चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनी (विकेटकीपर और कप्तान), ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दूबे, मोईन अली, रविंद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महीश तीक्षणा.
इम्पॅक्ट प्लेयर्स: मथीषा पथिराना, निशांत सिंधू, सुभ्रांशू सेनापती, शैक रशीद आणि आकाश सिंह.
चेन्नई संघाने 12 पैकी 7 सामने जिंकले
चेन्नईने या हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी सात जिंकले आणि 4 सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. संघाचे सध्या 15 गुण आहेत. डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, महिष तेक्षाना आणि मिचेल सँटनर हे कोलकाता विरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय तुषार देशपांडे, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्मात आहेत.
कोलकाताला 12 पैकी फक्त 5 सामने जिंकता आले
कोलकाताने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. संघाचे 10 गुण आहेत. चेन्नईविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू जेसन रॉय, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन असू शकतात. याशिवाय वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग हे संघासाठी चमकदार कामगिरी करत आहेत.
कोलकातापेक्षा चेन्नईचे पारडे जड
चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 18 सामने चेन्नईने तर 9 सामने कोलकाताने जिंकले आहेत. आणि एक सामना अनिर्णित झाला. चेपॉकमधील कोलकाताचा खेळ तसा आत्तापर्यंत वाईट झाला. येथे दोघांमध्ये 9 सामने खेळले गेले, ज्यामध्ये KKR फक्त 2 जिंकू शकला. चेन्नईने या मैदानावर 7 सामने जिंकले.
खेळपट्टीचा अहवाल
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असते तर या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा काढणे फार कठीण जाते.
हवामानाची स्थिती
रविवारी चेन्नईतील वातावरण उष्ण असणार आहे. येथील तापमान 30 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान असेल.
दोन्ही संघातील 11 खेळण्याची शक्यता
चेन्नई सुपर किंग्ज :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महिष तेक्षाना, तुषार देशपांडे आणि दीपक चहर.
इम्पॅक्टपूल प्लेयर :
मिचेल सँटनर, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग आणि मथिश पाथिराना.
कोलकाता नाइट रायडर्स :
नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्टपूल प्लेयर : सुयश शर्मा, मनदीप सिंग आणि वैभव अरोरा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.