आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये, लीग टप्प्यातील 57 वा सामना आज मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. गुणतालिकेत गुजरात अव्वल, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे.
या बातमीत जाणून घ्या, फॅन्टसी-11 च्या अव्वल खेळाडूंबद्दल. त्यांचा आयपीएल रेकॉर्ड आणि भूतकाळातील कामगिरी, ज्यावरून तुम्ही तुमच्या संघात कोणाचा समावेश करू शकता…
यष्टिरक्षक
ईशान किशनचा यष्टिरक्षक म्हणून समावेश केला जाऊ शकतो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 140 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 335 धावा केल्या आहेत. ईशानने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.
फलंदाज सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर यांना फलंदाजांमध्ये घेतले जाऊ शकते.
अष्टपैलू
अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पंड्या, कॅमेरून ग्रीन आणि विजय शंकर यांना घेतले जाऊ शकते.
बॉलर
पियुष चावला, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना गोलंदाज म्हणून घेतले जाऊ शकते.
कर्णधार कोणाला बनवावे?
सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवू शकता. त्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे आणि सध्या तो अव्वल फॉर्ममध्ये आहे. हार्दिक पंड्या किंवा शुभमन गिल यांना उपकर्णधार बनवले जाऊ शकते.
टीप : अलीकडील रेकॉर्ड आणि संभावनांच्या आधारे माहिती दिली आहे. हे मूल्यांकन सामन्यात योग्य किंवा चुकीचे असू शकते. संघ निवडताना फँटसी लीगशी संबंधित जोखीम लक्षात ठेवा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.