आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 62 धावांनी हरवत फायनलचे तिकिट पक्के केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरातने विजयासाठी दिलेल्या 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 18.2 षटकांत सर्व गडी गमावून 171 धावांपर्यंतच मजल मारता आली.
मोहित शर्माच्या 5 विकेट
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 61 धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने 43, कॅमेरून ग्रीनने 30 धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्यानंतर राशिद खानने आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2, तर जोशुआ लिटलने 1 विकेट घेतली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 233 धावा करत मुंबईला विजयासाठी 234 धावांचे आव्हान दिले.
मुंबईचा डाव
याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर नेहल वढेरा पहिल्या षटकात 4 धावांवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली. तर दुसऱ्या षटकात हार्दिकच्या चेंडूवर कॅमेरून ग्रीन रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर शमीने तिसऱ्या षटकात रोहित शर्मालाही 8 धावांवर आऊट केले. तर सहाव्या षटकात राशिद खानने तिलक वर्माला 43 धावांवर आऊट केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनने डाव पुढे नेत चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली. बाराव्या षटकात कॅमेरून ग्रीनला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तर पंधराव्या षटकात मोहित शर्माने सूर्यकुमार यादवला 61 धावांवर, तर विष्णू विनोदला धावांवर 5 बाद केले. तर पुढच्याच षटकात राशिद खानने टिम डेव्हिडला 2 धांवावर बाद केले. तर सतराव्या षटकात मोहित शर्माने क्रिस जॉर्डनला 2 धावांवर, तर पीयूष चावलाला शून्यावर बाद केले. मोहित शर्माने एकोणिसाव्या षटकात कुमार कार्तिकेयला 6 धावांवर बाद केले. मुंबईला 18.2 षटकांत 171 धावांपर्यंतच मजल मारता आली.
अशा पडल्या मुंबईच्या विकेट
गिलचे हंगामातील तिसरे शतक
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 233 धावा करत मुंबईला विजयासाठी 234 धावांचे आव्हान दिले. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 129 धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शनने 43, हार्दिक पंड्याने 28, वृद्धिमान साहाने 18 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवाल आणि पीयूष चावलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरातचा डाव
प्रथम फलंदाजी करताना गुजरातला ओपनर शुभमन गिल आणि वृद्धिमान साहाने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात वृद्धिमान साहाला 18 धावांवर बाद करत पीयूष चावलाने ही जोडी फोडली. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने डाव पुढे नेला. शुभमनने हंगामातील तिसरे शतक पूर्ण करत जोरदार फटकेबाजी केली. त्याने 60 चेंडूंत तडाखेबंद 129 धावा केल्या. सतराव्या षटकात आकाश मधवालने त्याची विकेट घेतली. तर एकोणिसाव्या षटकात साई सुदर्शन 43 धावांवर रिटायर्ड आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि राशिद खानने शेवटपर्यंत खेळत संघाची धावसंख्या 233 वर नेली. हार्दिक पंड्याने 28, तर राशिद खानने 5 धावा केल्या.
अशा पडल्या गुजरातच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग 11..
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
इम्पॅक्ट प्लेयर्स: रमणदीप सिंह, विष्णु विनोद, नेहल वढेरा, संदीप वॉरियर्स आणि राघव गोयल.
गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि नूर अहमद.
इम्पॅक्ट प्लेयर्स: जोशुआ लिटिल, श्रीकर भरत, ओडियन स्मिथ, आर साई किशोर आणि शिवम मावी.
मुंबईने 13 प्लेऑफ सामने जिंकले आहेत
मुंबई इंडियन्स लीगच्या टप्प्यानंतर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिले. संघाचे 14 सामन्यांत 8 विजय आणि 6 पराभवांसह 16 गुण होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने एलिमिनेटरमध्ये LSG चा 81 धावांनी पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. संघ 10व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. संघाने स्पर्धेच्या टॉप-4 टप्प्यात आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत. त्यांना 13 मध्ये विजय आणि 6 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
गुजरातविरुद्ध संघाचे चार विदेशी खेळाडू कॅमेरून ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड आणि ख्रिस जॉर्डन असू शकतात. याशिवाय फलंदाजीची खेळपट्टी पाहता अष्टपैलू हृतिक शोकीनच्या जागी स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेयला संधी मिळू शकते.
गुजरातला घरच्या मैदानाचा फायदा
गतविजेत्या गुजरात टायटन्सने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले. संघाचे 14 सामन्यांत 10 विजय आणि 4 पराभवातून 20 गुण होते, परंतु क्वालिफायर-1 मध्ये संघाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळेच संघाला अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची दुसरी संधी मिळाली. घरच्या मैदानावरील परिस्थितीचा फायदा गुजरातला मिळू शकतो. येथे संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत.
मुंबई विरुद्ध जीटीचे 4 परदेशी खेळाडू राशिद खान, नूर अहमद, डेव्हिड मिलर, दासुन शनाका आणि अल्झारी जोसेफ असू शकतात. संघ दर्शन नालकंडेच्या जागी शिवम मावी किंवा अभिनव मनोहरला, तर शनाकाच्या जागी जोसेफला संधी दिली जाऊ शकते.
मुंबईने 3 क्वालिफायर-2 पैकी 2 जिंकले
मुंबई इंडियन्स त्यांच्या 10व्या प्लेऑफमध्ये चौथ्यांदा क्वालिफायर-2 खेळणार आहे. यासह, पहिल्या संघाने क्वालिफायर-2 मध्ये तीनदा प्रवेश केला. संघाला 2 विजय आणि फक्त एक पराभव मिळाला. हा पराभव 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धही झाला होता. 2012 पासून संघाने 2 क्वालिफायर-2 खेळले आणि दोन्ही जिंकले. 2013 मध्ये संघाने राजस्थान रॉयल्स आणि 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.
दुसरीकडे, गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सामील झाल्यानंतर गुजरात प्रथमच क्वालिफायर-2 खेळणार आहे. मागील हंगामात संघाने क्वालिफायर-1 आणि अंतिम सामना जिंकून ट्रॉफी जिंकली होती.
मुंबईने गुजरातला दोनदा हरवले
हे दोन्ही संघ प्रथमच प्लेऑफमध्ये आमनेसामने येणार आहेत, परंतु स्पर्धेच्या साखळी टप्प्यात दोन्ही संघ आतापर्यंत तीनदा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये मुंबईने दोनदा तर गुजरातने एकदा विजय मिळवला आहे. या मोसमात दोन्हीमध्ये 2 सामने झाले, प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला, पण अहमदाबादमध्ये खेळलेला सामना गुजरातने जिंकला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.