आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रविवारी 2 सामने झाले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. राजस्थानच्या 3 फलंदाजांनी अर्धशतक केले तर युझवेंद्र चहलने 4 बळी घेतले.
सामन्यातील सर्व खेळाडूंनी दिवंगत सलीम दुर्रानी यांच्या स्मरणार्थ हातावर काळी पट्टी बांधली होती. उमरान मलिकने ताशी 149 किमी वेगाने देवदत्त पड्डीकलचे स्टंप उडवले. दक्षिण भारताचा सुपरस्टार दग्गुबती व्यंकटेश सामना पाहण्यासाठी पोहोचला आणि जेसन होल्डरने डायव्हिंग करत अप्रतिम झेल घेतला. पाहा, या सामन्यातील टॉप मोमेंट्स...
1. खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधून मैदानात प्रवेश केला
आयपीएलमध्ये रविवारी हैदराबाद आणि राजस्थान संघाचे सर्व खेळाडू काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरले. वास्तविक, माजी भारतीय क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अष्टपैलू दुर्रानी यांनी भारतासाठी 29 कसोटीत 1202 धावा केल्या आणि 75 बळीही घेतले.
दुर्रानी यांच्या स्मरणार्थ रविवारी आयपीएलमधील सर्व संघांनी दोन मिनिटे मौन पाळले आणि सर्व खेळाडू काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरले.
2. उमरानने पड्डीकलचे स्टंप विखुरले
पहिल्या डावात सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिकने 149 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. 15व्या षटकाच्या या चेंडूवर राजस्थानचा फलंदाज देवदत्त पड्डीकल उभाच राहिला आणि चेंडू स्टंपला फाडत गेला. उमरानने सामन्याच्या 3 षटकात 32 धावा दिल्या. त्याचवेळी पड्डीकलला 5 चेंडूत केवळ 2 धावा करता आल्या.
पहिल्या डावात राजस्थानने 5 गड्यांच्या मोबदल्यात 203 धावा केल्या. संजू सॅमसन (55), जोस बटलर (54) आणि यशस्वी जैस्वाल (54) यांनी अर्धशतक केले.
3. दक्षिण भारतीय सुपरस्टार व्यंकटेश यांनी सामना पाहिला
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार दग्गुबती व्यंकटेश देखील हैदराबादमध्ये आरआर आणि एसआरएच सामना पाहण्यासाठी पोहोचले. हैदराबाद संघाचा झेंडा घेऊन त्यांनी व्हीआयपी परिसरात बसून सामन्याचा आनंद लुटला.
4. बोल्टचा शानदार यॉर्कर
204 धावांचे लक्ष्य डिफेन्ड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानला पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने शानदार सुरुवात करून दिली. पहिला चेंडू डॉट केल्यानंतर बोल्टने अभिषेक शर्माकडे आउट स्विंगिंग यॉर्कर टाकला. अभिषेक बॉल समजू शकला नाही आणि बोल्ड झाला.
5. होल्डरने घेतला डायव्हिंग कॅच
दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीची विकेट घेतली. बोल्टने इन-स्विंग करणारा फुलर लेन्थ चेंडू राहुलकडे टाकला. राहुल शॉट खेळण्यासाठी पुढे गेला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील कड घेऊन स्लिपमध्ये गेला. स्लिपमध्ये उभे राहून जेसन होल्डरने त्याच्या डावीकडे डायव्ह मारत उत्कृष्ट झेल घेतला.
या विकेटनंतर हैदराबादची धावसंख्या 0/2 झाली. संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही आणि 20 षटकांत 8 गडी गमावून 131 धावाच करता आल्या. अशाप्रकारे मोसमातील पहिल्याच सामन्यात संघाला 72 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पाहा सामन्याचे आणखी काही मनोरंजक फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.