आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL 2023च्या मोसमात सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 72 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हा देशातील क्रिकेट स्पर्धांमुळे संघाचा कर्णधार एडन मार्करम उपलब्ध नसल्याने त्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, आता मार्करमने भारतात पोहोचून संघाची धुरा हाती घेतली आहे. हैदराबाद फ्रँचायझीने सोशल मीडियावर आपली काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये कर्णधार मार्करम संघाच्या प्रशिक्षण सत्रात खेळाडूंशी बोलताना दिसत आहे.
सनरायझर्स हैदराबादने बुधवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर कर्णधार एडन मार्करम संघात सामील झाल्याची काही छायाचित्रे शेअर केली. या छायाचित्रांमध्ये कर्णधार मार्करम संघाच्या सराव सत्रात पुढील सामन्यासाठी खेळाडूंशी चर्चा करताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करत फ्रँचायझीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "कॅप्टन मार्करम ड्यूटीवर रिपोर्ट करत आहे."
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच नेदरलँड्सविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 175 धावांची धडाकेबाज खेळी केली. आता मार्करमच्या नेतृत्वाखाली संघाला विजयी मार्गावर परतायचे आहे. सनरायझर्स हैदराबादचा दुसरा सामना 7 एप्रिल रोजी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळवला जाईल.
IPL 2023 साठी सनरायझर्स हैदराबाद संघ
केएल राहुल (कर्णधार), आयुष बदोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, काइल मेयर्स, कृणाल पंड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, डॅनियल सायम्स, अमित मिश्रा, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, नवीन-उल-हक आणि युधवीर चरक.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.