आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRH vs KKR फॅंटसी-11:नितीश राणा उत्कृष्ट फॉर्ममध्ये, रिंकू-मयंक मिळवून देऊ शकतात अधिक गुण

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. दोन्ही संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटी आहेत.

पुढील कथेत, या सामन्यातील फॅन्टसी-11 च्या टॉप प्लेयर्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याचा आयपीएल रेकॉर्ड आणि भूतकाळातील कामगिरी पाहूया. जेणेककरून तुम्हाला तुमच्या संघात कोणाचा समावेश करता येईल, याचा अंदाज येईल.

विकेटकिपर
विकेटकीपरसाठी हेन्रिक क्लासेन आणि रहमानउल्ला गुरबाज यांना घेतले जाऊ शकते. क्लासेनने 5 सामन्यात 100 धावा केल्या आहेत. तो आता मोठी खेळी खेळू शकतो. गुरबाजने 6 सामन्यात 145 च्या स्ट्राईक रेटने 183 धावा केल्या आहेत. त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत.

बॅट्समन
नितीश राणा, रिंकू सिंह आणि मयंक अग्रवाल यांना फलंदाजांमध्ये घेतले जाऊ शकते.

  • राणा मॅच वळवण्यात मास्टर आहे. सेट झाल्यानंतर, मोठी धावसंख्या बनवू शकतो. 9 सामन्यात 233 धावा केल्या आहेत.
  • रिंकूने 9 सामन्यात 54 च्या सरासरीने 270 धावा केल्या आहेत. त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत.​​​​​​​ मयंक 8 सामन्यात 110 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. केव्हाही मोठी खेळी खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे.

ऑल राऊंडर
एडन मार्करम, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून घेतले जाऊ शकते...

  • मार्करम हा टॉपचा खेळाडू आहे. आतापर्यंत 7 सामन्यात 132 धावा केल्या आहेत. दरम्यान, हैदराबादच्या खेळपट्टीवर तो चमत्कार करू शकतो.​​​​​​​
  • रसेल हा आक्रमक फलंदाज आहे. 9 सामन्यात 142 धावा करण्यासोबतच त्याच्या खात्यात 6 विकेट्सही जमा आहेत.​​​​​​​
  • नरेनने 9 सामन्यात 8.81 च्या इकॉनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या आहेत, परंतु कोणत्याही सामन्यात 3-4 विकेट्स घेऊन सामना फिरवण्याची क्षमता आहे.

बॉलर
गोलंदाजांमध्ये तुम्ही सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती आणि उमरान मलिक यांची निवड करू शकता.

  • सुयशने 7 सामन्यात 8.29 च्या इकॉनॉमी रेटने 9 विकेट घेतल्या आहेत.
  • वरुण आपल्या गूढ स्पिनिंगने हैदराबादच्या फलंदाजीना कहर करू शकतो. त्याने आतापर्यंत 9 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. ​​​​​​​
  • उमरानने 7 सामन्यात 10.35 च्या इकॉनॉमी रेटने 5 विकेट घेतल्या आहेत.

कर्णधार म्हणून कोणाची निवड करू शकता?

नितीश राणा कर्णधार घेऊ शकता, तो फॉर्ममध्ये आहे. भारतातील जवळपास सर्व खेळपट्ट्यांवर भरपूर धावा केल्या जातात. उपकर्णधार म्हणून एडन मार्करमची निवड होऊ शकते.