आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादला (SRH) 5 धावांनी हरवले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 9 गडी गमावून 171 धावा करत हैदरबादला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून 166 धावांपर्यंतच मजल मारता आली.
मार्करमच्या 41 धावा
हैदरबादकडून एडन मार्करमने सर्वाधिक 41 धावा केल्या. त्यानंतर हेन्रिक क्लासेनने 36, अब्दुल समदने 21, राहुल त्रिपाठीने 20, मयंक अग्रवालने 18 धावा केल्या. कोलकाताकडून वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर हर्षित राणा, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हैदराबादचा डाव
याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर मयंक अग्रवाल तिसऱ्या षटकात 18 धावांवर तर अभिषेक शर्मा चौथ्या षटकात 9 धावांवर बाद झाला. मयंकची विकेट हर्षित राणाने तर अभिषेकची विकेट शार्दुल ठाकूरने घेतली. त्यानंतर सहाव्या षटकात आंद्रे रसेलने राहुल त्रिपाठीला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर सातव्या षटकात अनुकूल रॉयने हॅरी ब्रूकला शून्यावर पायचित केले. यानंतर मार्करम आणि क्लासेनने संघाचा डाव सावरत पाचव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. पंधराव्या षटकात हेन्रिक क्लासेनला 36 धावांवर बाद करत शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडली. त्यानंतर वैभव अरोराने सतराव्या षटकात मार्करमला 41 धावांवर बाद केले. तर अरोरानेच एकोणिसाव्या षटकात मार्को यान्सेनला 1 धावेवर बाद केले. यानंतर विसाव्या षटकात वरुण चक्रवर्तीने अब्दुल समदला 21 धावांवर बाद केले. अखेर हैदराबादला 20 षटकांत 166 धावाच करता आल्या.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या हैदराबादच्या विकेट
रिंकू सिंहची फिफ्टी हुकली
कोलकाताकडून रिंकू सिंहने सर्वाधिक 46 धावा केल्या. त्यानंतर नितीश राणाने 42, आंद्रे रसेलने 24, जेसन रॉयने 20, अनुकूल रॉयने 13 धावा केल्या. हैदराबादकडून नटराजन व यान्सेनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडन मार्करम आणि मयंक मार्कंडेयने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलकाताचा डाव
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात त्यांचे दोन फलंदाज बाद झाले. मार्को यान्सेनने दुसऱ्या षटकात रहमानुल्लाह गुरबाजला शून्यावर, तर व्यंकटेश अय्यरला 7 धावांवर बाद केले. त्यानंतर पाचव्या षटकात कार्तिक त्यागीने जेसन रॉयला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंहने संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. बाराव्या षटकात नितीश राणाला 42 धावांवर बाद करत मार्करमने ही जोडी फोडली. त्यानंतर रिंकू सिंह आणि आंद्रे रसेलने डाव पुढे नेत 31 धावांची भागीदारी केली. पंधराव्या षटकात आंद्रे रसेलला 24 धावांवर बाद करत मार्कंडेयने ही जोडी फोडली. त्यानंतर सोळाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने सुनील नारायणला 1 धावेवर बाद केले. तर अठराव्या षटकात नटराजनने शार्दुल ठाकूरला 8 धावांवर बाद केले. त्यानंतर विसाव्या षटकात नटराजनने रिंकू सिंहला 46 धावांवर बाद केले. याच षटकात नटराजननने हर्षित राणाला धावबाद केले. कोलकाताने 20 षटकांत 9 गडी गमावून 171 धावा केल्या.
अशा पडल्या कोलकाताच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग-11...
सनरायझर्स हैदराबाद: एडन मार्करम (कर्णधार), हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, मार्को यान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर्स : राहुल त्रिपाठी, मार्को यान्सेन, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, उमरान मलिक.
कोलकाता नाइट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, रिंकू सिंह, वैभव अरोडरा, शार्दूल ठाकुर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर्स : सुयश शर्मा, मनदीप सिंह, अनुकूल रॉय, टिम साउदी आणि कुलवंत खेजरोलिया.
हैदराबादने 8 पैकी फक्त 3 सामने जिंकले
हैदराबादने या आयपीएल हंगामात आत्तापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांत 3 विजय आणि 5 पराभव पत्करले आहेत. संघाचे केवळ 6 गुण आहेत. हैदराबादने गेल्या सामन्यात दिल्लीचा 9 धावांनी पराभव केला होता. सध्या संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
कोलकाताविरूद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू हॅरी ब्रूक, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन आणि अकिल हौसेन असू शकतात. याशिवाय मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.
कोलकाताने 9 पैकी 3 सामने जिंकले
कोलकाताने या आयपीएल सामन्यात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने तीन जिंकले आणि 6 सामने गमावले. केकेआरचे आता 6 गुण आहेत. कोलकाताला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता.
रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि डेव्हिड व्हीजे हे हैदराबादविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय रिंकू सिंह, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू संघाला मजबूती देत आहेत.
हैदराबादवर कोलकाता संघ वरचढ
कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा आणि सनरायझर्स हैदराबादने एकदा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाताने 15 वेळा तर हैदराबादने 9 वेळा बाजी मारली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.