आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL वर भास्कर पोल:60% फॅन्सना वाटते फास्ट बॉलर बनणार टॉप विकेट टेकर, आतापर्यंत फक्त 2 स्पिनरला मिळाली आहे पर्पल कॅप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2021)चा रोमांच प्रत्येक मॅचसोबत वाढतच चालला आहे. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सला 7 विकेटने पराभूत केले. दोन सामन्यात फास्ट बॉलर्सने 19 आणि स्पिनर्सने 3 विकेट घेतल्या. भास्करने यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोल घेतला. यामध्ये 60% लोकांना असे वाटते की सीझनमध्ये एखादा फास्ट बॉलरच टॉप विकेट टेकर बनेल. याव्यतिरिक्त 40% लोकांना एखाद्या स्पिनरला पर्पल कॅप मिळेल असे वाटते. IPL मध्ये एका सीझनमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप मिळते.

आतापर्यंत फास्ट बॉलर्सचा राहिला आहे दबदबा
IPL मध्ये पर्पल कॅप मिळवण्यात फास्ट बॉलर्सचाच आताप्रर्यंत दबदबा दिसून आला आहे. यापूर्वी झालेल्या 13 सीझनपैकी 11 मध्ये फास्ट बॉलरलाच पर्पल कॅप मिळाली आहे. फक्त दोन सीझनमध्ये स्पिनरला पर्पल कॅप मिळाली आहे. हे दोन स्पिनर प्रज्ञान ओझा आणि इमरान ताहीर हे आहेत.

सोहेल तन्वीरला मिळाली होती पहिली पर्पल कॅप
IPL च्या पहिल्या सीझनमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनाही संधी मिळाली होती. 2008 मध्ये पर्पल कॅप पाकिस्तानचा फास्ट बॉलर सोहेल तन्वीरला मिळाली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना तन्वीरने 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या होत्या.

ब्राव्हो आणि भुनेश्वर कुमार 2-2 वेळेस बनले टॉप विकेट टेकर
IPL च्या इतिहासात केवळ दोन बॉलर्स ब्राव्हो आणि भुवनेश्वर कुमारच एकापेक्षा जास्त वेळेस पर्पल कॅप मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. दोघेही 2-2 वेळेस टॉप विकेट टेकर ठरले आहेत. ब्राव्होने 2013 आणि 2015 मध्ये पर्पल कॅप मिळवली होती. भुवनेश्वरने 2016 आणि 2017 मध्ये पर्पल कॅप मिळवली होती. सलग दोन सीझनमध्ये टॉप विकेट टेकरचा रेकॉर्ड फक्त भुवनेश्वरच्या नावावर आहे.

बातम्या आणखी आहेत...