आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL-2021) ची सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात RCB ने MI संघाला पराभूत केले. या सामन्यात दोन्ही संघातून टॉप 3 स्कोरर विदेशी फलंदाज राहिले. याव्यतिरिक्त फॅन्सला असे वाटते की या सीझनमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज एखादा भारतीय खेळाडू असेल.
ही माहिती भास्करच्या सोशल मीडिया पोलमधून समोर आली आहे. भास्करने पोलच्या माध्यमातून फॅन्सना विचारले होते की, या वर्षी सर्वात जास्त धावा काढणार फलंदाज भारतीय असेल की विदेशी. या पोलवर 85.5% लोकांनी एखादा भारतीय फलंदाज टॉप स्कोरर राहील असे सांगिलते. तर 14.5% लोकांना एखादा विदेशी खेळाडू ऑरेंज कॅप मिळवेल असे सांगितले. सीझनमध्ये सर्वात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.
आतापर्यंत कोणताही भारतीय खेळाडू दोनदा ऑरेंज कॅप मिळवू शकला नाही
IPL मध्ये ऑरेंज कॅप मिळवण्यात विदेशी खेळाडूच पुढे आहेत. यापूर्वी झालेल्या 13 सीझनमध्ये 9 वेळेस विदेशी खेळाडूच टॉप स्कोरर राहिले आहेत. भारतीय खेळाडूंना 4 वेळेसच ऑरेंज कॅप मिळाली आहे. परंतु आतापर्यंत एकही भारतीय खेळाडू 2 वेळेस ऑरेंज कॅप मिळवू शकला नाही. विदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नरने तीन वेळेस ऑरेंज कॅप मिळवली आहे. ख्रिस गेलनेही दोन वेळेस ऑरेंज कॅप मिळवली आहे.
सर्व 13 सीझनमध्ये टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना ऑरेंज कॅप
टी-20 क्रिकेटमध्ये टॉप ऑर्डर (ओपनिंग आणि नंबर-3) फलंदाजांकडे जास्त बॉल खेळण्याची संधी राहते. यामुळे ऑरेंज कॅपवरही यांचे वर्चस्व राहते. आयपीएलच्या सर्व 13 सीझनमध्ये ज्या फलंदाजांनी ऑरेंज कॅप मिळवली आहे ते सर्वजण बहुतांश सामन्यात ओपनिंग किंवा नंबर-3 खेळले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.