आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Ipl Cricket 2021: Mumbai Matches Likely To Be Canceled; The BCCI Has Come Up With An Alternative To The Second Stadium; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान:मुंबईतील सामने रद्द होण्याची शक्यता; बीसीसीआयने शोधला दुसऱ्या स्टेडियमचा पर्याय

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईमध्ये दहा सामन्यांचे आयोजन; नऊ हजार रुग्ण सापडले शनिवारी

महाराष्ट्रामध्ये काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अाता याठिकाणी मोठ्या संख्येत काेराेनाच्या बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत अाहे. पुणे, मुंबई, नागपूर, अाैरंगाबादमध्ये ही संख्या वाढलेली अाहे. महाराष्ट्रातील काेराेनाचा वाढता कहर पाहिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीअाय) अडचणीत सापडले अाहे. महाराष्ट्रात काेराेनाचा धोका कायम असल्याने अाता यंदाच्या १४ व्या सत्रातील आयपीएलचे सामने मुंबईत अायाेजित करणे अाव्हानात्मक अाहे. दुसरीकडे हे चित्र अधिक गंभीर झाल्यास कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. येत्या १० एप्रिल राेजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज अाणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना हाेणार अाहे. त्यानंतर या मैदानावर अायपीएलच्या नऊ सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले.

एकूणच महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने हाेणे कठीण असल्याचे चित्र अाहे. हीच गंभीर अाणि अाव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने अाता पर्यायी दाेन स्टेडियमचा शाेध घेतला. यामध्ये इंदूर अाणि हैदराबादचा समावेश अाहे. येत्या शुक्रवारपासून अायपीएलच्या सत्राला सुरुवात हाेईल. काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन बीसीसीआयने आयपीएल सामन्यादरम्यान खेळाडूंचा प्रवास हाेणार नाही, याच दृष्टीने अधिक काटेकोरपणे नियोजन केले. यासाठी मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरू अाणि कोलकाता या मर्यादित सहा शहरांची निवड केली हाेती. मात्र, अाता महाराष्ट्रामध्ये काेराेनाच्या केसेस वेगाने वाढत अाहेत. एकट्या मुंबईत ४० हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह काेराेना केसेस अाहेत. त्यामुळेच सध्या याठिकाणी सामने अायाेजित करणे धाेकादायक ठरेल, असेही बीसीसीअायला वाटत अाहे.

दिल्लीचा अक्षर पटेल मुंबईतच पाॅझिटिव्ह; दुसऱ्या टेस्टमध्ये बाधितचा अहवाल
अाठवडाभरानंतर १४ व्या सत्राच्या अायपीएलला सुरुवात हाेणार अाहे. मात्र, देशभरात नव्याने अालेल्या काेराेनाच्या लाटेने लीगच्या अायाेजनावर सावट निर्माण झाले अाहे. याच काेराेनाचा अाता माेठा फटका दिल्ली कॅपिटल्स संघाला बसण्याला अाहे. स्पर्धेपूर्वीच दिल्लीचा संघ अडचणीत सापडला. कारण, दिल्लीचा सुपरस्टार अाॅलराऊंडर अक्षर पटेल हा नुकताच काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर अाले. ताे सध्या अापल्या सहकाऱ्यांसोबत सराव करत हाेता. त्याची दुसरी टेस्टही पॉझिटिव्ह अाली अाहे. त्याची पहिली टेस्टही निगेटिव्ह अाली हाेती. त्यानंतर ताे टीमसोबत सराव करत हाेता.

हाॅट मुंबईमध्ये स्मिथ झाला दाखल
अाॅस्ट्रेलियन अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ अाता शनिवारी मुंबईमध्ये दाखल झाला अाहे. ताे अाता सात दिवस क्वाॅरंटाइन राहणार अाहे. त्यानंतर ताे आयपीएलच्या तयारीसाठी अापल्या टीम दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरात सहभागी हाेणार अाहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सराव शिबिराचे अायाेजन मंुबईत अायाेजित करण्यात अाले.

वानखेडे: कर्मचारी, १० मॅनेजर बाधित
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील कर्मचारी , १० मॅनेजर काेराेनाबाधित असल्याचे समाेर अाले. मुंबईतील याच वानखेडे स्टेडियमवर १० एप्रिल राेजी आयपीएलचा सामना हाेणार अाहे. त्यामुळे सध्या याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झालेले अाहे. मुंबईत काेराेना केसेसेच्या संख्येत वाढ हाेत अाहे. शनिवारी नऊ हजार रुग्ण सापडले.

तरीही ४ संघांचे मुंबईतच सराव शििबर
सध्या महाराष्ट्रात काेराेनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले अाहे. अशा गंभीर परिस्थितीतही मुंबईतच सराव करण्याला पंसती दिली जात अाहे. दुसरीकडे आयपीएलच्या तयारीसाठी चार फ्रॅचाइझींनी मुंबईची निवड केली. त्यामुळे सध्या पंजाब, दिल्ली, चेन्नई व राजस्थान असे संघ सध्या मुंबईत अायपीएलची जाेमाने तयारी करत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...