आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 28 डाव आणि 3 सत्रांनंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला. याआधी धोनीने 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध आयपीएलमध्ये शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर धोनीने 48 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. काल तो कोलकाताविरुद्ध 38 चेंडूत 50 धावा करून नाबाद राहिला होता.
धोनीच्या या खेळीनंतर त्याच्या क्लबचे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांनी दैनिक भास्करला सांगितले की, माहीची ही खेळी त्याच्या मेहनतीचे फळ आहे. ऑफ सीझनमध्ये त्याने युवा गोलंदाजांसोबत भरपूर घाम गाळला. रांची येथील स्टेडियममध्ये जाऊन तो अंडर-19 आणि झारखंड रणजी संघाच्या युवा गोलंदाजांसोबत फलंदाजीचा सराव करत होता. त्याने चेन्नईच्या संघात नेट बॉल म्हणून काही तरुण गोलंदाजांचाही समावेश केला आहे.
फिटनेसवरही केले आहे काम
धोनीचे प्रशिक्षक पुढे म्हणाले की, माजी CSK कर्णधाराने जिममध्ये आणि मैदानावर फिटनेसवर खूप काम केले आहे. सामन्यातील त्याचा फिटनेसही अप्रतिम होता. तो 40 वर्षांचा झाला असे कुठेच दिसत नव्हते. त्याची रनिंग बिटवीन द विकेटही तरुण खेळाडूंसारखी होती. मला विश्वास आहे की तो आयपीएलमध्ये आणखी एक वर्ष खेळू शकेल पण धोनी नेहमीच धक्कादायक निर्णय घेतो. अशा स्थितीत पुढील सीझनबाबत ठोसपणे काहीही सांगता येणार नाही.
पुढच्या डावांमध्ये दाखवेल कमाल
भट्टाचार्य पुढे म्हणाले- धोनीने ऑफ सीझनमध्ये रांचीमध्ये युवा खेळाडूंसोबत ज्याप्रकारे सराव केला, त्यावरून मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, तो आयपीएलच्या पुढील सामन्यांमध्ये आणखी चमकदार खेळ दाखवेल आणि अनेक विक्रम आपल्या नावावर करेल.
संघातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणा
चंचल यांनी म्हटले की अर्थातच धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे, परंतु त्याची खेळी संघातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी होती. तरुण खेळाडूंच्या मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.
अजूनही चांगले फिनिशर
प्रशिक्षकांनी धोनीचे कौतुक केले आणि सांगितले की, तीन वर्षांनंतर धोनीने पुन्हा एकदा 38 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली आणि दाखवून की त्याच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. तसेच तो एक चांगला फिनिशर आहे. या सीझनमध्ये तो त्याच्या शानदार खेळाच्या जोरावर संघाला विजय मिळवून देईल, असा मला विश्वास आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.