आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊला हरवत मुंबईची क्वालिफायर-2 मध्ये एंट्री:81 धावांनी केले पराभूत, मधवालने 5 धावा देत 5 गडी केले बाद, लखनऊचे 3 खेळाडू गोंधळात धावबाद

चेन्नई5 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) 81 धावांनी पराभूत करत क्वालिफायर-2 मध्ये एंट्री केली आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 16.3 षटकांत सर्व गडी गमावून 101 धावाच करता आल्या.

आकाश मधवालच्या 4 विकेट

लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर काईल मेयर्सने 18, दीपक हुडाने 15 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने 5, तर क्रिस जॉर्डन आणि पीयूष चावलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली. लखनऊचे 3 गडी धावबाद झाले. तत्पूर्वी मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 182 धावा करत लखनऊला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले.

लखनऊचा डाव

याचा पाठलाग करताना लखनऊची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर प्रेरक मंकड दुसऱ्या षटकात 3 धावांवर बाद झाला. आकाश मधवालने त्याची विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या षटकात क्रिस जॉर्डनने काईल मेयर्सला 18 धावांवर बाद केले. तर त्यानंतर नवव्या षटकात पीयूष चावलाने कृणाल पंड्याला 8 धावांवर बाद केले. तर पुढच्याच षटकात आकाश मधवालने आयुष बडोनीला 1 धावेवर, तर निकोलस पूरनला शून्यावर बाद केले. त्यानंतर बाराव्या षटकात मार्कस स्टॉयनिस 40 धावांवर धावबाद झाला. तर पुढच्याच षटकात कृष्णप्पा गौतमही 2 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर पंधराव्या षटकात आकाश मधवालने रवि बिश्नोईला 3 धावांवर बाद केले. तर याच षटकात दीपक हुडा 15 धावांवर धावबाद झाला. तर सतराव्या षटकात आकाश मधवालने मोहसिन खानला शून्यावर बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लखनऊला 16.3 षटकांत सर्व गडी गमावून 101 धावाच करता आल्या.

पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड

अशा पडल्या लखनऊच्या विकेट

 • पहिलीः दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आकाश मधवालने प्रेरक मंकडला ऋतिक शौकिनच्या हाती झेलबाद केले.
 • दुसरीः चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्रिस जॉर्डनने काईल मेयर्सला कॅमेरून ग्रीनच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरीः नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पीयूष चावलाने कृणाल पंड्याला टिम डेव्हिडच्या हाती झेलबाद केले.
 • चौथीः दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाश मधवालने आयुष बडोनीला बोल्ड केले.
 • पाचवीः दहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आकाश मधवालने निकोलस पूरनला ईशान किशनच्या हाती झेलबाद केले.
 • सहावीः बाराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिस धावबाद झाला.
 • सातवीः तेराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कृष्णप्पा गौतम धावबाद झाला.
 • आठवीः पंधराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश मधवालने रवि बिश्नोईला क्रिस जॉर्डनच्या हाती झेलबाद केले.
 • नववीः पंधराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीपक हुडा धावबाद झाला.
 • दहावीः सतराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश मधवालने मोहसिन खानला बोल्ड केले.

नवीन उल हकच्या 4 विकेट

मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 33, तिलक वर्माने 26, नेहल वढेराने 23, ईशान किशनने 15, टिम डेव्हिडने 13, रोहित शर्माने 11 धावा केल्या. लखनऊकडून नवीन उल हकने 4 विकेट घेतल्या. तर यश ठाकूरने 3, मोहसिन खानने 1 विकेट घेतली.

मुंबईचा डाव

प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर रोहित शर्मा चौथ्या षटकात 11 धावांवर बाद झाला. नवीन उल हकने त्याची विकेट घेतली. त्यानंतर पुढच्याच षटकात यश ठाकूरने ईशान किशनला 12 धावांवर बाद केले. त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादवने डाव पुढे नेत तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात सूर्यकुमार यादवला 33 धावांवर बाद करत नवीन उल हकने ही जोडी फोडली. नवीनने त्याच षटकात ग्रीनलाही 41 धावांवर बाद केले. यानंतर टिम डेव्हिड आणि तिलक वर्माने डाव पुढे नेत पाचव्या गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. सतराव्या षटकात टिम डेव्हिडला 13 धावांवर बाद करत यश ठाकूरने ही जोडी फोडली. त्यानंतर अठराव्या षटकात नवीन उल हकने तिलक वर्माला 26 धावांवर बाद केले. यानंतर एकोणिसाव्या षटकात मोहसिन खानने क्रिस जॉर्डनला 4 धावांवर बाद केले. यानंतर नेहल वढेरा आणि ऋतिकने शेवटपर्यंत खेळत संघाची धावसंख्या वर नेली. नेहलने 23 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर यश ठाकूरने नेहल वढेराला बाद केले.

पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड

अशा पडल्या मुंबईच्या विकेट

 • पहिलीः चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नवीन उल हकने रोहित शर्माला आयुष बडोनीच्या हाती झेलबाद केले.
 • दुसरीः पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यश ठाकूरने ईशान किशनला निकोलस पूरनच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरीः अकराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नवीन उल हकने सूर्यकुमार यादवला कृष्णप्पा गौतमच्या हाती झेलबाद केले.
 • चौथीः अकराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नवीन उल हकने कॅमेरून ग्रीनला बोल्ड केले.
 • पाचवीः सतराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यश ठाकूरने टिम डेव्हिडला दीपक हुडाच्या हाती झेलबाद केले.
 • सहावीः अठराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नवीन उल हकने तिलक वर्माला दीपक हुडाच्या हाती झेलबाद केले.
 • सातवीः एकोणिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहसिन खानने क्रिस जॉर्डनला दीपक हुडाच्या हाती झेलबाद केले.
 • आठवीः विसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश ठाकूरने नेहल वढेराला रवि बिश्नोईच्या हाती झेलबाद केले.

लखनऊने सलग दुसऱ्यांदा प्लेऑफ गाठले

एलएसजी सलग दुसऱ्यांदा आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. लखनऊने गेल्या मोसमातही पात्रता मिळवली होती. एलिमिनेटरमध्ये बंगळुरूविरुद्ध अखेरचा संघ हरला होता.

लखनऊ संघाकडे सर्व फलंदाजांमध्ये विविध प्रकारचे शॉट्स आहेत. निकोलस पूरन 174 च्या प्रभावी स्ट्राइक रेटसह जबरदस्त हिटिंग फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत बिश्नोई उत्कृष्ट फॉर्मात आहे.

मुंबईच्या संघात हंगामातील दोन शतकवीर
मुंबई इंडियन्सने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि सामना जिंकण्यासाठी 200 धावांचे लक्ष्य गाठले. त्यांची फलंदाजी उत्तम फॉर्ममध्ये आहे. या मोसमात मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन या दोघांनी शतके झळकावली. त्याचबरोबर संघाची गोलंदाजीही उत्कृष्ट झाली आहे. गेल्या सामन्यात आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत 4 बळीही घेतले होते.

लखनऊचे पारडे जड
दोन्ही संघांत मुंबईवर लखनऊचे पारडे जड आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपरजायंट्सला हरवता आलेले नाही.

खेळपट्टी अहवाल
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीत संतुलन असेल. यामध्ये वेगवान गोलंदाजांसोबत फिरकीपटूंचीही मदत मिळणार आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना काही स्विंग मिळेल तर सामन्याच्या नंतरच्या टप्प्यात फिरकीपटूही खेळात येतील. पहिल्या डावात सरासरी 160-170 धावा.

हवामान स्थिती
बुधवारी चेन्नईमध्ये परिस्थिती अनुकूल असेल. हवामान स्वच्छ राहील. तापमान 29 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पंड्या (C), मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मोहसिन खान.

इम्पॅक्ट प्लेयर - आयुष बडोनी

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार) , ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय.
इम्पॅक्ट प्लेयर - विष्णू विनोद