आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL Final CSK Vs KKR In The Final Dhoni Will Be The King Of The League For The Fourth Time, Morgan Wants To Repeat The Feat Like 2019

IPL चॅम्पियन:चेन्नई सुपरकिंग्ज संघ चौथ्यांदा चॅम्पियन, कोलकाता नाइट रायडर्स संघ पहिल्यांदा ठरला उपविजेता; फायनलमध्ये 27 धावांनी पराभव

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंंग्ज संघाने यंदा १४ व्या सत्रातील आयपीएलमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. चेन्नईने विजयादशमीला शुक्रवारी फायनलमध्ये दाेन वेळच्या किताब विजेत्या काेलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी पराभूत केले. यासह चेन्नईने चौथ्यांदा चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. पराभवाने काेलकाता संघाला पहिल्यांदा स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने तीन बाद १९२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात शार्दूल ठाकूर (३/३८), रवींद्र जडेजा (२/३७) आणि जाेश हेझलवुडच्या (२/२९) भेदक माऱ्याने दमछाक झालेल्या काेलकाता संघाला ९ गड्यांच्या माेबदल्यात १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. टीमकडून सलामीवीर शुभमान गिल (५१) आणि व्यंकटेश अय्यरने (५०) केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. या दाेघांनी ९१ धावांच्या भागीदारीची सलामी देत संघाला दमदार सुरुवात करून दिली हाेती. मात्र, कर्णधार माॅर्गनसह (४), सुनील नरेन (२), दिनेश कार्तिक (९) राहुल त्रिपाठी (२) स्वस्तात बाद झाले. तसेच नितीश राणा भाेपळा न फाेडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

शार्दूल ठरला सुपरस्टार : युवा गाेलंदाज शार्दूल ठाकूर चेन्नईच्या किताबासाठी सुपरस्टार ठरला. त्याने तीन बळी घेत काेलकाता टीमच्या धावंसख्येला ब्रेक लावला.

नवव्यांदा फायनलमध्ये; चाैथ्या विजयी : धाेनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाने नवव्यांदा आयपीएलची फायनल गाठली. यात चेन्नईने चाैथ्यांदा फायनल जिंकून किताबाचा चाैकार मारला. चेन्नई संघ पाच वेळा उपविजेता ठरला आहे. यंदा चेन्नईने पहिल्यांदा फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला. दुसरीकडे काेलकाता संघाने तिसऱ्यांदा फायनल गाठली हाेती. मात्र, काेलकाता संघाचा पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पराभव झाला. यापुर्वी दाेन वेळा फायनल जिंकून चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम काेलकाता संघाने गाजवला.

पुण्याचा ऋतुराज सर्वात युवा आॅरेंज कॅप विजेता
पुण्याच्या युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड शुक्रवारी काेलकाताविरुद्ध फायनलमध्ये ३२ धावांची खेळी केली. त्याने ४५.३६ च्या सरासरीने १६ सामन्यात ६३५ धावांची कमाई केली. यासह २४ वर्षीय ऋतुराज सर्वात युवा आॅरेंज कॅप विजेता ठरला. त्याने शाॅन मार्शला (२५) मागे टाकले.

बातम्या आणखी आहेत...