आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत IPL मध्ये 20 व्या ओव्हरचे सिंकदर:​​​​​​​धोनीने अखेरच्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त 50 षटकार ठोकले, पोलार्ड आणि हिटमॅन रोहितही मागे नाहीत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL 2022 ची सुरुवात 26 मार्चपासून सुरू होणार आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या लीगमध्ये लांब षटकार मारणे सामान्य आहे. या लीगमध्ये काही फलंदाज अशा पद्धतीने खेळतात की ते 20 व्या ओव्हरपर्यंत टिकून राहिले तर गोलंदाजांना घाम फुटतो. कोणत्याही डावात 20वे ओव्हर सर्वात महत्त्वाचे असते. आयपीएलच्या इतिहासात शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या अशाच काही खेळाडूंबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

1. महेंद्र सिंह धोनी
शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या बाबतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव आघाडीवर आहे. आयपीएलच्या 20व्या ओव्हरमध्ये 50 षटकार मारणारा धोनी पहिला खेळाडू आहे. 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या माहीने IPL 14 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार मारून आयपीएलच्या इतिहासात 50 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला होता. 1

जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी हा जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर मानला जातो. यासाठी धोनी नेटमध्ये मोठे शॉट्स खेळताना सतत घाम गाळतो. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरते हे धोनीला माहीत आहे. त्यामुळे धोनी स्वत:ला त्यानुसार तयार करतो.

2. कीरोन पोलार्ड
आयपीएलमधील कीरोन पोलार्डचा विक्रम अतुलनीय राहिला आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कीरोन पोलार्डने आपल्या चमकदार कामगिरीमुळे मुंबई संघासाठी जवळपास गमावलेले अनेक सामने जिंकले आहेत. पोलार्डने आयपीएलच्या इतिहासात डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एकूण 30 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने 2022 च्या लिलावापूर्वी पोलार्डला 6 कोटी देऊन कायम ठेवले होते.

श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 6 षटकार ठोकणारा पोलार्ड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील युवराज सिंगनंतरचा दुसरा खेळाडू आहे. पोलार्ड जगभरातील T20 लीगमध्ये त्याच्या लांब षटकारांसाठी ओळखला जातो. जर पोलार्डची बॅट पुन्हा एकदा फॉर्मात असली तर आयपीएल 15 दरम्यान मैदानात बसलेल्या प्रेक्षकांवर अनेक चेंडू उडतील.

3. रोहित शर्मा
20व्या ओव्हरमध्ये षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्माही तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 23 वेळा षटकार मारले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. जरी IPL 14 मध्ये मुंबईची कामगिरी काही खास नव्हती. अशा स्थितीत मुंबईला सहाव्यांदा विजेतेपद मिळवायचे असेल, तर शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहून रोहितला आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवावी लागेल.

रोहित इशान किशनसोबत डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. रोहितने शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवावे, अशी मुंबई कॅम्पची इच्छा आहे.

4. हार्दिक पंड्या
लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने 20 व्या ओव्हरमध्ये 23 षटकार मारले आहेत.

IPL 15 मध्ये हार्दिक पहिल्यांदाच कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. T-20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर हार्दिक पहिल्यांदाच मैदानात पाहायला मिळणार आहे. फिटनेस परत मिळवण्यासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्येही भाग घेतला नव्हता. जर त्याच्या पाठीचा त्रास पूर्णपणे बरा झाला तर त्याची बॅट नक्कीच कमाल दाखवेल.

5. रवीन्द्र जडेजा
चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सर रवींद्र जडेजा शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळी चेन्नईच्या संघाने धोनीच्या 12 कोटींच्या तुलनेत 16 कोटी इतकी मोठी रक्कम देऊन त्याला कायम ठेवले आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या जडेजानेही श्रीलंकेविरुद्ध 175 धावांची धडाकेबाज खेळी खेळून आपल्या जबरदस्त फॉर्मचे संकेत दिले आहेत. 20व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रवींद्र जडेजा 5व्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 20 व्या ओव्हरमध्ये 22 षटकार मारले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आयपीएलचे 5 व्यांदा विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर जडेजाला आपल्या बॅटने षटकार मारावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...