आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुणवंत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या नव्या नेतृत्वाखाली अाता दिल्ली कॅपिटल्स संघ यंदाच्या १४ व्या सत्रातील अायपीएलमध्ये अापले नशिब अाजमावणार अाहे. दिल्लीचा संघ १० एप्रिल राेजी चेन्नई सुपरकिंग्ज टीमविरुद्ध अापल्या सलामी सामन्यातून अायपीएलमधील माेहिमेला सुरुवात करणार अाहे. वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स अाणि चेन्नई यांच्यात सामना हाेणार अाहे. गतवर्षीच्या फायनलिस्ट दिल्लीला कधीच नशिबाची साथ मिळाली नाही. पहिल्या तीन सत्रात संघ सर्वात उत्कृष्ट होता, मात्र व्यवस्थापनाने सर्वांना बाहेर केले. त्यानंतर सतत नवनवे खेळाडू खरेदी केले तरी यश मिळाले नाही. कधीही भविष्याचा विचार करून संघ बांधणी करण्यात आली नाही. २०१५ नंतर संघाचा दृष्टिकोन बदलला. संघाने तेव्हापासून श्रेयस अय्यर, ऋषभ पंत व पृथ्वी शॉसारख्या युवा खेळाडूंना संधी दिली. पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर संघाच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्याचा आशा वाढल्या.
रहाणे प्रबळ दावेदार; स्मिथसाठी वाट खडतर
धवन व पृथ्वी शॉ जोडी संघाच्या डावाची सुरुवात करेल. दोघे शानदार लयीत आहेत. त्यानंतर अजिंक्य रहाणे, पंत, स्टोइनिस व हेटमायरचा नंबर लागतो. इंग्लंडचा सॅम बिलिंग्जदेखील आहे. यात स्मिथला सुरुवातीला संधी मिळणे कठीण आहे. तो टी-२० तज्ज्ञ खेळाडू नाही. त्यामुळे पंतकडे नेतृत्व देण्यात आले. लिलावातही त्याला मूळ किमतीपेक्षा केवळ २० लाख अधिक देऊन खरेदी करण्यात अाले.
फिरकीत अनुभवी त्रिकूट
दिल्लीकडे भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर. अश्विन, स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज अमित मिश्रा व अक्षर पटेल आहेत. त्यांच्या जोडीला प्रवीण दुबे व एम. सिद्धार्थदेखील आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवने पुन्हा एकदा घरच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्याने दिल्ली संघातूनच आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. उमेशसह ईशांत शर्मा, आवेश, मेरीवालासारखे भारतीय पर्याय आहेत. त्याचबरोबर रबाडा व नोर्तजे ही द. आफ्रिकन जोडी आहे. त्यामुळे टीमला सामन्यादरम्यान अापला दबदबा निर्माण करण्याची माेठी संधी अाहे.
ऑलराउंडरमुळे पारडे जड; ठरतील अधिक वरचढ
संघाकडे वेगवान गोलंदाज अष्टपैलूत स्टोइनिस, टॉम करेन व क्रिस वोक्सचा पर्याय आहे. स्टोइनिस आयपीएलमध्ये ९.३८ आणि करेन ११.५१ च्या इकॉनॉमीने धावा देतो. वोक्स फलंदाजी विशेष काही करू शकला नाही. भारतीय अष्टपैलूतही त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यांनी हर्षल पटेलला बंगळुरूकडून घेतले आहे.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर व विल्यम्स चेन्नईत दाखल;सात दिवस क्वॉरंटाइन
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह केन विल्यम्स व सहायक प्रशिक्षक ब्रँड हेडिन चेन्नईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे, मुंबईचा ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने व जिमी निशमदेखील भारतात पोहोचले. सात दिवस क्वॉरंटाइन राहिल्यानंतर हे खेळाडू सराव करू शकतील. त्यानंतर टीमच्या खेळाडूंना जाेमाने अायपीएलची तयारी करता येणार अाहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.