आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचौकार-षटकारांची आयपीएल स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होईल. ८ संघ खेळतील. पहिला सामना भारतीय कर्णधार कोहलीचा बंगळुरू संघ आणि उपकर्णधार रोहितच्या मुंबई संघादरम्यान होईल.
सामन्याआधी कोहलीचे ‘चक दे’ शैलीत प्रेरणादायी भाषण
विराट कोहलीने प्रशिक्षण सत्रात ‘चक दे’ स्टाइलमध्ये भाषण दिले. तो म्हणाला,‘जे नवे खेळाडू आरसीबीत आले आहेत, त्यांचे स्वागत. या हंगामातही संघाची ऊर्जा शानदार राहील. मैदानावर आपल्या वेळेचा योग्य उपयोग कराल, अशी मी आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो. आपण चांगल्या ऊर्जेसह खेळत आलो आहोत. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आपण सर्व जण मिळून खूप काही नवे करू शकतो.’
विशेष : ही स्पर्धा टी २० वर्ल्ड कपची निवड चाचणीच समजा
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी २० वर्ल्ड कप आहे. भारताला आयपीएलनंतर निवडक टी २० खेळायचे आहेत, त्यामुळे ही स्पर्धा निवड चाचणीप्रमाणेच असेल. टी २० टीममधून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेले शिखर धवन आणि कुलदीप यादव यांचे भविष्य आयपीएलद्वारेच निश्चित होणार आहे.
बदललेल्या नियमांसह होत आहे लीग
एक्स फॅक्टरच्या या ५ खेळाडूंवर नजर
ऋषभ पंत : दिल्ली संघाचा कर्णधार. मागील स्पर्धेत चांगला खेळला नाही.
ईशान किशन: मागील हंगामात सर्वाधिक ३० षटकार. वर्ल्ड कप संघात येऊ शकतो.
प्रसिद्ध कृष्णा: गती, उसळी दोन्ही आहेत. इंग्लंडविरुद्ध चांगली गोलंदाजी.
सूर्यकुमार : मोठे फटके मारतो. २०१८ मध्ये मुंबईसाठी सर्वाधिक १४१६ धावा केल्या.
देवदत्त पड्डीकल: २०२० मध्ये कोहली व डिव्हिलियर्सपेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.