आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPLसाठी बायो-बबल:खेळाडू येण्यापूर्वी यूएईच्या 14 हॉटेल्समधील 750 हून अधिक कर्मचाऱ्यांची टेस्ट; संपूर्ण स्पर्धेदरम्यान 30 हजार टेस्ट केल्या जातील

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPLचा दुसरा टप्पा कोरोनापासून वाचवण्यासाठी बीसीसीआय आटोकाट प्रयत्न करत आहे. लीग दरम्यान, यूएईच्या व्हीपीएस हेल्थकेअरला आपत्कालीन वैद्यकीय सेवा, स्पोर्ट्स मेडिसिन सपोर्ट, स्पेशलिस्ट टेलि कन्सलटेशन, डॉक्टर ऑन कॉल, ॲम्ब्युलन्स, एअर ॲम्ब्युलन्स यासारख्या सेवांसाठी भागीदारी करण्यात आली आहे.

औषध आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी 100 सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे, जी खेळाडूंना मदत करेल. प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियममध्ये दोन वैद्यकीय टीम उपलब्ध असतील, ज्यात डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स आणि लॅब टेक्निशियन यांचा समावेश असेल.

सामने कमी पण टेस्ट जास्त
दुसऱ्या टप्प्यात कमी सामने असूनही, कोविड चाचण्या अधिक होतील. खेळाडू यूएईला पोहोचण्यापूर्वी दुबई आणि अबू धाबीमधील 14 हॉटेल्समध्ये 750 हून अधिक कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. नवीन कोविड प्रोटोकॉलनुसार, प्रत्येक तिसऱ्या दिवशी सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांची चाचणी केली जाईल. स्पर्धेदरम्यान 30 हजार कोरोना चाचण्या होतील. याव्यतिरिक्त, बायो-बबलसाठी परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याच 14 हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले आहे ज्यात खेळाडू आहेत.

व्हीपीएस हेल्थकेअरचे CEO डॉ. शाजीर गफ्फार यांनी सांगितले की, 'आमची टीम IPL दरम्यान मेडिकल सुविधा देण्यासाठी तयार आहे. संपूर्ण स्पर्धेत सुरक्षित वातावरण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. साथीच्या काळात हाय-प्रोफाईल स्पोर्ट्स इव्हेंटच्या संदर्भात यूएईचा स्ट्राइक रेट चांगला आहे. आयपीएल नंतर टी-20 विश्वचषक देखील आहे. आशा आहे की यामुळे युएईला सुरक्षित जागतिक क्रीडा स्थळ म्हणून उदयास येण्यास मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...