आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL Punjab Beats Chennai: Punjab Take Advantage Of Wicket taking In Power Play; Fans Also Praised The Bowlers | Marathi News

IPL पंजाबकडून चेन्नईचा मानहानीकारक पराभव:पॉवर प्ले मध्ये विकेट घेतल्याने पंजाबच्या संघाला फायदा; गोलंदाजांचीही चाहत्यांकडून प्रशंसा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतविजेता चेन्नई सुपर किंग संघाला आयपीएलच्या चालू हंगामात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबच्या संघाने चेन्नईचा पराभव केला. चालू हंगामातील चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव आहे. पंजाबच्या संघाने चेन्नई पुढे विजयासाठी 181 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, चेन्नईच्या संघाला ते पेलता आले नाही.

पंजाबच्या संघाने 181 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर चेन्नईची सुरुवातच खराब झाली. 5 बाद 36 धावा अशी अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर धोनी आणि शिवम दुबे यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. धोनी स्थिरावनंतर त्याने फटकेबाजी सुरु केली असतानाच चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. धोनी 28 चेंडूत 23 धावा करू शकला.

विकेट घेतल्याचा फायदा

पॉवर प्ले मध्ये विकेट घेतल्याने पंजाबच्या संघाला फायदा झाला. विकेट पडल्याने फलंदाजांवर दबाव वाढला होता. पंजाबच्या संघाची गोलंदाजी सुधारली असून त्याचा फायदा अंतिम सामन्यापर्यंत पोचण्यासाठी संघाला होणार असल्याचे मत पंजाबच्या चाहत्यांनी व्यक्त केले आहे. चेन्नईच्या संघासमोर खेळताना आजपर्यंत पंजाबचा संघ फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता. मात्र आता संघाने यशस्वी सुरुवात केली असून संघ नक्की आयपीएल विजयाचा दावेदार असल्याचे मतही पंजाबचे चाहते आकाश सैनी यांनी व्यक्त केले.

पंजाबच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले सत्यजित रावराणे आणि त्यांचा मुलगा धोनीचा चाहता स्वराज रावराणे.
पंजाबच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले सत्यजित रावराणे आणि त्यांचा मुलगा धोनीचा चाहता स्वराज रावराणे.

बाप-लेकाची जोडी, धोनीवर पंजाब भारी

मुंबईतील रहिवासी सत्यजित रावराणे आपला मुलगा स्वराज रावराणे याच्यासोबत सामना बघण्यासाठी आले होते. त्यांचा मुलगा धोनीचा चाहता असून चेन्नईच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर हजर होता. तर सत्यजित हे पंजाब संघाचे चाहते आहेत. मैदानात वडील आणि मुलाची ही जोडी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.

बातम्या आणखी आहेत...