आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरात टायटन्सला (GT) धावांनी हरवत फायनलमध्ये धडक दिली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकांत सर्व गडी गमावून 157 धावाच करता आल्या.
चहर-तीक्षणा-जडेजा-पथिरानाच्या प्रत्येकी 2 विकेट
गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावा केल्या. त्यानंतर राशिद खानने 30, दसुन शनाकाने 17, विजय शंकरने 14, तर वृद्धिमान साहाने 12 धावा केल्या. तर चेन्नईकडून दीपक चहर, महीश तीक्षणा, रविंद्र जडेजा, मथीषा पथिरानाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली. तत्पूर्वी गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी बाद 172 धावा करत गुजरातला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले.
गुजरातचा डाव
याचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर वृद्धिमान साहा तिसऱ्या षटकात 12 धावांवर बाद झाला. दीपक चहरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सहाव्या षटकात महीश तीक्षणाने हार्दिक पंड्याला 8 धावांवर बाद केले. तर अकराव्या षटकात रविंद्र जडेजाने दसुन शनाकाला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर तेराव्या षटकात रविंद्र जडेजाने डेव्हिड मिलरला 4 धावांवर आऊट केले. तर पुढच्याच षटकात दीपक चहरने शुभमन गिलला 42 धावांवर आऊट केले. तर पंधराव्या षटकात तीक्षणाने राहुल तेवतियाला 3 धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात मथीषा पथिरानाने विजय शंकरला 14 धावांवर बाद केले. याच षटकात दर्शन नलकांडे शून्यावर धावबाद झाला. तर पुढच्याच षटकात तुषार देशपांडेने राशिद खानला 30 धावांवर आऊट केले. यानंतर नूर अहमद आणि मोहम्मद शमीने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाची धावसंख्या 157 वर नेली. शमी शेवटच्या चेंडूवर आऊट झाला.
अशा पडल्या गुजरातच्या विकेट
गायकवाडची फिफ्टी
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्यानंतर डेवॉन कॉनवेने 40, रविंद्र जडेजाने 22, तर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडूने प्रत्येकी 17 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर दर्शन नलकांडे, राशिद खान आणि नूर अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
चेन्नईचा डाव
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 87 धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात ऋतुराजला 60 धावांवर बाद करत मोहित शर्माने ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात नूर अहमदने शिवम दुबेला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर पंधराव्या षटकात दर्शन नलकांडेने अजिंक्य रहाणेला 17 धावांवर बाद केले. तर पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने डेवॉन कॉनवेला 40 धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात राशिदने अंबाती रायुडूला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर एकोणिसाव्या षटकात मोहित शर्माने धोनीला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने जडेजाला 22 धावांवर बाद केले. चेन्नईच्या 20 षटकांत 7 गडी बाद 172 धावा झाल्या.
अशा पडल्या चेन्नईच्या विकेट
क्वालिफायर-1 मधील विजयी संघ अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करेल. तर, पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी असेल. एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये त्याला प्रवेश मिळेल.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11...
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महीश तीक्षणा.
इम्पॅक्ट प्लेयर्स : मिशेल सँटनर, राजवर्धन हंगरगेकर, शेख रशीद आणि आकाश सिंह.
गुजरात टाइटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, नूर अहमद, दर्शन नालकंडे आणि मोहम्मद शमी.
इम्पॅक्ट प्लेयर्स : विजय शंकर, श्रीकर भरत, साई किशोर, जयंत यादव, शिवम मावी.
कॉनवे-गायकवाडची तुफानी फलंदाजी
चेन्नईने या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 14 पैकी 8 सामने जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या मोसमात संघाचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी भागीदारीत ६८८ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत आज दोघेही गेले तर संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो.
डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, मथिशा पाथिराना आणि महिश तेक्षाना हे गुजरातविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, अजिंक्य रहाणे हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्मात आहेत.
पाठलाग ही गुजरातची ताकद
गुजरातने या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 14 पैकी 10 सामने जिंकले असून केवळ चार सामने गमावले आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने चमकदार कामगिरी केली आणि 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. संघाने पाठलाग करताना हंगामातील 10 पैकी 6 सामने जिंकले. पाठलाग करताना, त्यांनी या मोसमातील ७५% सामने जिंकले आहेत, त्यामुळे संघ चेन्नईविरुद्धही पाठलाग करू इच्छितो.
CSK विरुद्धच्या संघातील 4 विदेशी खेळाडू डेव्हिड मिलर, राशिद खान, नूर अहमद, अल्झारी जोसेफ आणि दासुन शनाका असू शकतात. याशिवाय मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.
अष्टपैलू शनाका या मोसमात केवळ दोनच सामने खेळला आहे. पण त्याच्या अनुभवामुळे संघ त्याला प्लेइंग-11 मध्ये ठेवतो. तो बाहेर राहिला तर साई सुदर्शन, शिवम मावी किंवा अभिनव मनोहर यापैकी एकाला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळू शकते.
चेन्नईवर गुजरातचे पारडे जड
हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत. गुजरातने तीनही वेळा विजय मिळवला. हे सामने ब्रेबॉर्न, वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले. त्याचवेळी चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने असतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.