आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:जायबंदी सुंदर वाॅशिंग्टन बाहेर; अक्षदीपला बंगळुरूकडून संधी

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये यंदाच्या सत्रातील आयपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांना सुरुवात हाेणार आहे. यासाठी सध्या सहभागी संघांंची आपापल्या खेळाडूंच्या जमवा-जमवची चांगलीच धांदल उडालेली आहे. कारण सध्याच्या आंतरराष्ट्रीय दाैऱ्यामुळे भारतासह विदेशी टीमचे खेळाडू जायबंदी झालेले आहेत. याचाच माेठा फटका आता काेहलीच्या बंगळुरू टीमला बसला. कारण, दुखापतीमुळे टीमचा युवा आॅलराउंडर सुंदर वाॅशिंग्टन आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही.

त्याला इंग्लंड संघाविरुद्ध कसाेटी मालिकेपूर्वी सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली. सुंदरला काउंटी इलेव्हनकडून खेळताना माे. सिराजचा चेंडू लागला हाेता. याच दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली. यातून त्याला आता आयपीएलच्या सामन्यातही सहभागी हाेता येणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी बंगळुरू संघाने बंगालच्या वेगवान गाेलंदाज अक्षदीपला संधी देण्याचा निर्णय जाहीर केला. ताे संघासाठी नेट्स बाॅलरच्या भूमिकेत हाेता. त्याने आतापर्यंत १५ टी-२० सामन्यात खेळताना २१ विकेट घेतल्या आहेत. आता त्याच्या कामगिरीवर सर्वांचे खास लक्ष असेल.

ऋषभकडे नेतृत्व कायम : सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची धुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे कायम ठेवण्यात आली. टीमचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर आता पूर्णपणे दुखापतीतून सावरला आहे. मात्र, फ्रँचाइजीने अय्यरला पूर्णपणे सावरण्यासाठी नेतृत्वाची धुरा सध्या तरी न साेपवण्याचा निर्णय घेतला. ऋषभच्या नेतृत्वात टीमने ८ सामन्यांत १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. आता टीमला विजेतेपद मिळवून देण्याचा विश्वास त्याने यादरम्यान व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...