आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या सुरुवातीच्या 5 दिवसांत 7 सामने पूर्ण झाले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये परदेशी खेळाडू आणि रिस्ट स्पिनर्सचा बोलबाला राहिला आहे. रवी बिश्नोईसारख्या युवा भारतीय खेळाडूने एकीकडे आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. तर ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन आणि तिलक वर्माने जोरदार फलंदाजीने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. तथापि, 7 पैकी 5 सामन्यांत परदेशी खेळाडू प्लेयर ऑफ द मॅच ठरले. दुसरीकडे बेन स्टोक्स, सॅम करन, हॅरी ब्रूक आणि कॅमरून ग्रीनसारखे कोट्यवधींत विकल्या गेलेल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स मात्र तेवढ चांगला राहिला नाही.
पुढच्या स्टोरीत आपण आयपीएलच्या सुरुवातीच्या 7 सामन्यांचा ट्रेंड जाणून घेऊ. कोणत्या खेळाडूंचा दबदबा राहिला, स्कोअरिंग रेट कसा राहिला आणि कोणते खेळाडू गेमचेंजर ठरले. सोबतच टॉप कमाई करणाऱ्या खेळाडूंवरही नजर टाकू.
स्टोरीत पुढे जाण्यापूर्वी आयपीएलची गुणतालिका बघा...
डिफेंडिंग चॅम्पियन्स आतापर्यंतची बेस्ट टीम
आयपीएलची डिफेंडिंग चॅम्पियन्स टीम गुजरात टायटन्सने टूर्नामेंटच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. नंतर त्यांनी दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानावर 6 गड्यांनी मात दिली. गुजरात 2 पैकी 2 सामने जिंकत 4 अंकांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. राजस्थान, बंगळुरू, लखनऊ, पंजाब आणि चेन्नईने प्रत्येकी एका सामन्यात विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्स सुरुवातीच्या दोन्ही मॅच हरली. दिल्लीशिवाय कोलकाता, मुंबई आणि हैदराबादलाही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
महागड्या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये ऑलराऊंडर्स आणि विशेषतः परदेशी खेळाडूंची तिजोरी खूप भरली होती. मात्र टुर्नामेंटच्या पहिल्या आठवड्यात या महागड्या खेळाडूंची कामगिरी खास राहिली नाही. यात 17.50 कोटींचा कॅमरून ग्रीन, 16.5 कोटींचा बेन स्टोक्स आणि 13.25 कोटींच्या हॅरी ब्रूकची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली.
मुंबईच्या ग्रीनने बंगळुरूच्या बॅटिंग विकेटवर केवळ 5 धावा केल्या आणि 2 षटकांच्या गोलंदाजीत 30 धावा दिल्या. स्टोक्सनेही 2 सामन्यांत 15 धावा केल्या आणि एक षटक गोलंदाजी करत 18 धावा दिल्या. राजस्थानविरोधातील 204 धावांच्या आव्हानासमोर ब्रूकने 21 चेंडूंत केवळ 13 धावा केल्या.
18.50 कोटी रुपयांत पंजाब टीमचा भाग बनलेल्या सॅम करनने बॅटिंगमध्ये 17 चेंडूंत 26 धावा केल्या आणि आंद्रे रसेलची विकेट घेतली. मात्र तो गोलंदाजीत महागडा ठरला आहे. तर 16 कोटी रुपयांत लखनऊ टीमचा भाग बनलेल्या निकोलस पूरनने सर्वात चांगली कामगिरी करत 39 चेंडूंत 6 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या आहेत. मात्र तोही सीएसकेविरोधातील सामन्यात आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही.
याशिवाय 10 कोटींच्या मार्कस स्टॉयनिसने 28 चेंडूंत केवळ 21 धावा केल्या. 8.25 कोटींचा टीम डेव्हीड आणि 8 कोटींचा जोफ्रा आर्चरही फ्लॉप ठरला आहे. दोघेही मुंबई इंडियन्स टीमचा भाग आहेत.
7 पैकी केवळ 2 सामन्यांत भारतीयांना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार
आयपीएलमध्ये सामान्यपणे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिकन आणि विंडिजच्या खेळाडूंचे वर्चस्व बघायला मिळते. यावेळी सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आतापर्यंत 7 पैकी 5 वेळा परदेशी खेळाडूंनाच प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. यात अफगाणिस्तानचा राशीद खान, वेस्ट इंडिजचा काइल मेयर्स, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस आणि इंग्लंडचा मोईन अली आणि जोस बटलर यांचा समावेश आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन, पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकू शकले आहेत. राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहलही प्लेयर ऑफ द मॅच राहिला आहे. मात्र त्याला बटलरसोबत संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला होता.
हार्दिक, रोहित, राहुलची फ्लॉप सुरुवात
कोहली, धोनीसारख्या खेळाडूंनी सुरुवातीच्या सामन्यांतच आपल्या परफॉर्मन्सने छाप सोडली, तर काही दिग्गज भारतीय खेळाडू फ्लॉपही ठरले. यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याही 2 सामन्यांत 15 चेंडूंत 8 धावाच करू शकला आणि तो एकही विकेट घेऊ शकला नाही. इतर गोलंदाजांपैकी दीपक चहर सर्वात महागडा ठरला. सीएसकेसाठी 2 पैकी एकाही सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही. तर त्याने 8 षटकांतच 84 धावा दिल्या. याशिवाय ईशान किशन, शार्दुल ठाकूर, राहुल त्रिपाठी, पृथ्वी शॉसारखे स्टार खेळाडूही सुरुवातीच्या सामन्यांत खास कामगिरी करू शकले नाही.
3 वेळा 200+ धावा
धावसंख्येच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हाय स्कोअरिंग सामने होत आहे. 7 सामन्यांच्या 14 डावांत 3 वेळा 200 पेक्षा जास्त धावा झाल्या. सीएसकेने चेपॉक स्टेडियममध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना एलएसजीनेही 205 धावा केल्या.
सर्वात कमी धावसंख्या एसआरएचच्या नावे आहे. 203 धावांचा पाठलाग करताना एसआरएचला 131 धावाच करता आल्या होत्या. टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत पहिल्या डावातील सरासरी स्कोअर 188 तर दुसऱ्या डावाचा सरासरी स्कोअर 163 राहिला आहे.
धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांच्या पराभवाचे प्रमाण 57.14%
स्पर्धेत एक ट्रेंड खूप कॉमन राहिला, तो म्हणजे टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा. मात्र या हंगामात आतापर्यंत टॉस जिंकणे म्हणजे मॅच जिंकण्याची गॅरंटी ठरली नाही. कारण टॉस जिंकणाऱ्या सर्व 7 टीम्सनी फिल्डिंग घेतली मात्र 4 वेळा आधी बॅटिंग करणाऱ्या टीमने विजय मिळवला. म्हणजेच चेस करणाऱ्या टीम 4.86% सामने जिंकू शकल्या.
71.43% मॅच होम टिम्सनी जिंकल्या
3 हंगामांनंतर IPL होम-अवे फॉर्मॅटमध्ये परतला आहे. याचा परिणामही बघायला मिळाला. 7 पैकी 5 सामने होम टिम्सनी जिंकले आहेत. केवळ 2 वेळा दिल्ली आणि हैदराबादला आपल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादमध्ये तर राजस्थानने टॉस हरल्यानंतरही 72 धावांच्या फरकाने सामना जिंकला. तर गुजरातने दिल्लीला 6 विकेटने हरवले.
पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपरजायंटस अशा 3 टिम ठरल्या, ज्यांनी घरच्या मैदानावर टॉस हरल्यानंतरही सामने जिंकले. तर गुजरात आणि बंगळुरूने घरच्या मैदानावर टॉस आणि मॅचही जिंकली.
रिस्ट स्पिनर्स ठरले गेमचेंजर
आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये रिस्ट स्पिनर्स गेमचेंजर ठरले आहेत. यात गुजरातचा राशीद खान, राजस्थानचा युजवेंद्र चहल, लखनऊच्या रवी बिश्नोईने आपल्या टीमसाठी शानदार परफॉर्मन्स करताना टॉप-5 विकेट टेकरच्या यादीत जागा मिळवली. याशिवाय बंगळुरूच्या कर्ण शर्माने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 2 महत्वाच्या विकेट घेत मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
दिल्लीच्या कुलदीप यादवनेही बॅटर्सला बांधून ठेवले आणि महत्वाच्या क्षणी विकेट घेतल्या. या रिस्ट स्पिनर्सशिवाय चेन्नईचा मोईन आली, रविंद्र जडेजा आणि मिचेल सँटनर, कोलकाताचा सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीसारखे फिंगर स्पिनर्सही आपल्या टीमसाठी ट्रम्प कार्ड ठरले.
वेगवान गोलंदाज पर्पल कॅप लिस्टमध्ये
रिस्ट स्पिनर्स एकिकडे गेमचेंजर ठरत असताना इंटरनॅशनल पेसर्स जास्त विकेट घेत पर्पल कॅपच्या रेसमध्ये पुढे आहेत. लखनऊच्या मार्क वूडने 2 सामन्यांतच 8 विकेट घेतल्या. या यादीत गुजरातचा मोहम्मद शमी 5 विकेटसह दुसऱ्या आणि 4 विकेटसह अल्झारी जोसेफ सहाव्या क्रमांकावर आहे.
याशिवाय राजस्थानचा ट्रेंट बोल्ट, हैदराबादचा फजलहक फारुखी, पंजाबचा अर्शदीप सिंह आणि दिल्लीचा एन्रिक नॉर्त्यानेही आपल्या टीमला सुरुवातीच्याच षटकांत विकेट मिळवून देण्याचे काम केले आहे. येणाऱ्या सामन्यांत कसिगो रबाडा, जोफ्रा आर्चर, उमरान मलिक, भूवनेश्वर कुमार आणि उमेश यादवही या यादीत सहभागी होताना दिसू शकतो.
युवा भारतीय टॉप स्कोअरर लिस्टमध्ये पुढे
टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत एकही सेंच्युरी झालेली नाही, मात्र युवा भारतीय खेळाडू टॉप रन स्कोअररच्या यादीत पुढे आहे. सीएसकेचा ऋतुराज गायकवाड 2 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 149 धावा करून ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहे. या यादीत मुंबईचा तिलक वर्मा आणि गुजरातचा साई सुदर्शन 84-84 धावांसह चौथ्या स्थानी आहे.
सोबतच यादीत काइल मेयर्स, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसचेही नाव आहे. तर दिल्लीचा अभिषेक पोरेल, लखनऊचा आयुष बडोनीसारख्या काही युवा बॅटर्सनी सुरुवातीच्या सामन्यांत आपल्या प्रतिभेने सर्वांना प्रभावित केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.