आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:फ्रँचायझी आज करणार संघ जाहीर, 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांना सुरुवात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्या महिन्यात १९ सप्टेंबरपासून यंदाच्या सत्रातील आयपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांना सुरुवात हाेणार आहे. यासाठी लीगमधील सहभाागी संघ आता यूएईमध्ये दाखल हाेत आहे. आता याच उर्वरित सामन्यांसाठी फ्रँचायझी शुक्रवारी लीगमधील आपल्या सहभागी संंघांची घाेषणा करणार आहेत. यासाठी बीसीसीआयने आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व फ्रँचायझींना याबाबतची घाेषणा लवकर करावी लागेल. या लीगसाठी काही संघ युएईत दाखल झाले. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा संघ उद्या शनिवारी युएईला रवाना हाेणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सलामी सामना रंगणार आहे.

सध्या इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी आयपीएलच्या सामन्यादरम्यान आपापल्या टीमकडून खेळण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. आयपीएलमधील सहभागाचा निर्णय दाेन्ही क्रिकेट मंडळांनी संबंधित खेळाडूंवर साेडला आहे.

त्यामुळे खेळाडूंनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचे मंडळाला सांगितले. दरम्यान, याच लीगच्या माध्यमातून इंग्लंड,आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह इतर देशांच्या खेळाडूंना टी-२० विश्वचषकाचीही तयारी करण्याची संधी आहे. कारण, याच यूएईमध्येच याच वातावरणामध्ये आॅक्टाेबर महिन्यात टी-२० वर्ल्डकप हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...