आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL Top Bowling Records Malinga Top Wicket Taker, But Rashid Most Profitable, Harbhajan Throwing The Most Going Dot Ball

IPL मधील गोलंदाजीचे रेकॉर्ड:मलिंगा टॉप विकेट टेकर, परंतु राशिद सर्वात फायदेशीर, हरभजनने सर्वात जात डॉट बॉल टाकले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) तडाखेबाज फलंदाजी आणि धावांसाठी ओळखले जाते. यामध्ये फलंदाजांना रोखणे हे गोलंदाजांसाठी एक आव्हान असते. लसिथ मलिंगा, हरभजनसिंग, राशिद खान यांच्यासारखे काही दिग्गज गोलंदाज यामध्ये काही प्रमाणात सफलही ठरले आहेत. श्रीलंकेचा फास्ट बॉलर मलिंगा मागचे आयपीएल खेळाला नाही. तरीही १७० विकेट घेऊन टॉपवर आहे.

यासोबतच सर्वात कमी धावा देण्याचा रेकॉर्ड अफगाणिस्तानचा बॉलर राशिद खानच्या नावावर आहे. राशिदचा इकॉनॉमी रेट ६.२४ आहे. डॉट बॉलमध्ये हरभजनसिंगच्या जवळपासही कोणी नाही. भज्जीने आतापर्यंत लीगमध्ये एकूण ५६२ ओव्हर टाकल्या असून त्यामध्ये १२४९ डॉट बॉल होते.

टॉप बॉलर विकेट
लसिथ मलिंगा - १७०
अमित मिश्रा १६०
पियुष चावला १५६
डेव्हेन ब्राव्हो - १५३
हरभजनसिंग १५०
रविचंद्र अश्विन 138

अमित 3 आणि युवराजने २ वेळेस घेतली आहे हॅट्रिक

आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ गोलंदाजांनी हॅट्रिक विकेट घेतल्या आहेत. भारतीय स्पिनर अमित मिश्राने आतापर्यंत सर्वात जास्त ३ वेळेस हॅट्रिक घेतली आहे. ऑलराऊंडर युवराजसिंगनेसुद्धा २ वेळेस हॅट्रिक विकेट घेतली आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व बॉलर्सने एक-एक वेळेस हॅट्रिक घेतली आहे.

लक्ष्मीपती बालाजीने घेतली होतील लीगमधील पहिली हॅट्रिक
टुर्नामेंटमधील पहिली हॅट्रिक १० मे २००८ रोजी CSK टीमचा फास्ट बॉलर लक्ष्मीपती बालाजीने घेतली होती. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध बालाजीने पहिली हॅट्रिक घेतली होती. मागील हॅट्रिक राजस्थान रॉयल्सच्या श्रेयस गोपालने 30 एप्रिल 2019 मध्ये घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...