आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UAE मध्ये होणार IPL चे उर्वरित 31 सामने:विदेशी खेळाडूंच्या बाबतीत इतर देशांशी चर्चा करेल BCCI, टी-20 वर्ल्डकप निर्णयासाठी ICC कडे जूनपर्यंतचा वेळ मागणार

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ने आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएई येथे आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याची पुष्टी केली. बोर्डाने म्हटले आहे की, यासाठी फक्त सप्टेंबर-ऑक्टोबर विंडोचा विचार करण्यात आला आहे. यूएईमध्ये अबूधाबी, शारजाह आणि दुबईच्या मैदानावर सामने होतील. येत्या काही दिवसात BCCI परदेशी खेळाडूंबद्दल परदेशी बोर्डाशीही बोलणार असल्याचेही बैठकीत ठरवण्यात आले. इंग्लिश बोर्डाने यापूर्वीच खेळाडूंवर निर्बंध घातले आहेत.

टी-20 विश्वचषक संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची 1 जून रोजी बैठक होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यासाठी बैठकीत बीसीसीआय जूनपर्यंत वेळ मागेल. विश्वचषक संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बोर्ड भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेईल.

IPL टी-20 वर्ल्ड कपसाठी तयारीचे माध्यम
आयपीएलचे उर्वरित 31 सामने युएईमध्ये 18-19 सप्टेंबर ते 9-10 ऑक्टोबर दरम्यान खेळले जाऊ शकतात. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरच्या विंडोचा विचार करत आहोत. विश्वचषक स्पर्धेच्या अगोदर आयपीएल पूर्ण होणे टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंसाठी माध्यम ठरू शकते. टी-20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबरपासून सुरु होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...