आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये अवेश खानचा जलवा:लखनऊ संघाचे चाहते म्हणाले, 'राहुलने तो मचा डाला'; दीपक हुडाची ​​​​​​​धमाकेदार खेळी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद आणि लखनऊ दरम्यान झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने बाजी मारत हैदराबाद संघाचा 12 धावांनी पराभव केला. लखनऊ संघाकडून खेळताना गोलंदाज अवेश खानने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अवेशने सुरुवातीलाच हैदराबादच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर त्याने निकलेस पुरन आणि अब्दुल समदला बात केल्याने सामना लखनऊच्या बाजूने फिरला.

हुडा आणि राहुलच्या खेळीचे कौतुक

लखनऊ संघाचा कर्णधार लोकेश राहुल आणि दिपक हुडा यांनी धमाकेदार फटकेबाजी करत चाहत्यांना नाचायला भाग पाडले. हुडाने 31 चेंडू मध्ये 3 चौकार आणि 3 शतकांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले. तर राहुलने देखील 50 चेंडूंत 6 चौकार आणि एका षटकाच्या जोरावर 61 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. लखनऊच्या संघाने आपण विजयाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले असल्याचे, मत लखनऊच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

निकलेस पुरन बाद झाल्याने बाजी पलटली

लखनऊ संघाच्या चाहत्यांनी सांगितले की, अवेश खानने निकलेस पुरन याचा महत्त्वाचा बळी घेतला. आणि त्यामुळे बाजी पलटली. लखनऊच्या संघाच्या फलंदाजांबरोबरच गोलंदाजांचेही मन भरून कौतुक चाहत्यांनी केले. दिव्य मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले की, निकलेस पुरन बाद होणे हा मॅचमध्ये टर्निंग पॉइंट होता.

बातम्या आणखी आहेत...