आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतरही विजयाची आशा:कागिसो रबाडाच्या खेळीने वेधले सर्वांचे लक्ष; पंजाब किंग्स संघावर चाहत्यांचा विश्वास कायम

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर रंगला. या सामन्यात केकेआर संघाने पंजाबच्या संघावर सहज मात केली. दहा शतके पूर्ण होण्याआधीच पंजाबचा अर्धा संघ तंबूत परतला होता. चार बाद 51 धावा तर 5 बाद 84 धावा अशी पंजाबची अवस्था झाली होती. पंजाब संघाला 134 धावांवर रोखण्यात केकेआर संघाला यश आले होते.

कागिसो रबाडाच्या खेळीने सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अखेरच्या षटकांमध्ये दमदार फटकेबाजी करत त्याने 25 धावा केल्या. सोळा चेंडूत 1 षटकार आणि चार चौकारांसह त्याने केलेल्या 25 धावांमुळे पंजाब संघाच्या विजयाची आशा वाढली होती. फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही रबाडाचे कौशल्य दिसून आले. त्यांनी टाकलेल्या 3 षटकांमध्ये 23 धावा देत 1 गडी बाद केला. त्याचबरोबर राहुल चहर याने देखील 4 षटकांमध्ये तेरा धावा देत दोन गडी बाद केले. त्यामुळे कागिसो रबाडा, चहर आणि शिखर धवन सारख्या खेळाडूंवर चाहत्यांच्या अजूनही विश्वास कायम आहे. 'मॅच हार गये, पर दिल जीत लिया।' असे म्हणत चाहत्यांनी संघाला प्रोत्साहित केले आहे.

पंजाबच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मुंबई मधील वानखेडे स्टेडियमवर आलेल्या पटियालाच्या (पंजाब) काजल मान.
पंजाबच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मुंबई मधील वानखेडे स्टेडियमवर आलेल्या पटियालाच्या (पंजाब) काजल मान.

आज कोणीच चांगले खेळले नाही

पंजाब किंग्स संघाचा चाहत्यांची शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात निराशा झाली. संघातील एकही खेळाडू चांगला खेळला नाही, त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे मत पंजाबच्या पटियाला येथून आलेल्या काजल मान यांनी व्यक्त केले. चांगले दिवस आणि वाईट दिवस दोन्ही असतात त्यामुळे त्याचा विचार न करता पंजाबचा संघ अंतिम फेरीपर्यंत जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

अतिआत्मविश्वास नको

पंजाबच्या संघाला अतिआत्मविश्वास नडला अशी प्रतिक्रिया देखील काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. अतिआत्मविश्वास नको मात्र उत्साहाने खेळले पाहिजे असे मत काजल मान यांनी व्यक्त केले आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने सकारात्मक विचार करून स्पर्धेला सामोरे जावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...