आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या या सीझनमध्ये आतापर्यंत झालेल्या निराशाजनक प्रदर्शनानंतर सनरायझर्स हैदराबादने कर्णधार बदलण्याचे निश्चित केले आहे. 2016 मध्ये टीमला चॅम्पियन बनवणारा खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या जागी आता केन विल्यमसनला हैदराबाद संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. यासोबतच उद्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यांसाठी ओव्हरसीज कॉम्बिनेशनची जागा बदलण्याचा निर्णयही संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे टीम
IPL च्या या सीझनमध्ये हैदराबादने आतापर्यंत 6 सामन्यांपैकी 5 सामने गमावले आहेत. सध्या ही टीम पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. चैन्नई सुपरकिंग्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर वॉर्नरने पराभवाची जबाबदारी स्वतः घेतली होती. त्यानंतर फ्रँचायझीने कर्णधार बदलण्याचे निश्चित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.