आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात टायटन्सला मोठा धक्का:केन विल्यमसनला गंभीर दुखापत, IPL 2023च्या संपूर्ण सीझनमधून बाहेर

स्पोर्ट्स डेस्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 16व्या हंगामाला सुरुवात झाली. या सामन्यात गुजरातचा स्टार खेळाडू केन विल्यमसनला गंभीर दुखापत झाली आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने विजयाचा आनंद लुटला होता, पण हा संघ फार काळ आनंदी राहू शकला नाही. गुजरात टायटन्सने मिनी लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतलेला संघाचा स्टार खेळाडू केन विल्यमसन आता संपूर्ण हंगामातून बाहेर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सीझनच्या पहिल्या सामन्यात विल्यमसनने सीएसकेविरुद्ध षटकार रोखण्याचा प्रयत्न केला, त्याने धावा वाचवल्या, पण यात त्याला गंभीर दुखापतही झाली.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, केन विल्यमसन आता संपूर्ण स्पर्धेतून बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सीझनच्या सुरुवातीला जेव्हा विल्यमसनला दुखापत झाली तेव्हा तो उभा राहू शकत नव्हता. त्याला सहायक कर्मचारी आणि फिजिओने आधार देऊन बाहेर नेले. त्यानंतर तो स्कॅनसाठी गेला ज्यामध्ये त्याला ACL टियर 2 ची दुखापत आढळून आली आहे. या दुखापतीमुळे तो किमान दोन महिने बाहेर असेल. IPL 2023 मधून त्याला वगळल्याची बातमी सोशल मीडियावरही पसरत आहे. तथापि, या संदर्भात IPL किंवा फ्रेंचायझी गुजरात टायटन्सची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

षटकार रोखण्याच्या प्रयत्नात विल्यमसनला गंभीर दुखापत झाली होती.
षटकार रोखण्याच्या प्रयत्नात विल्यमसनला गंभीर दुखापत झाली होती.

विल्यमसनची दुखापत किती गंभीर?

वृत्तसंस्था पीटीआयने असेही सांगितले की, त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि संपूर्ण हंगामात तो मैदानाबाहेर राहू शकतो. याशिवाय गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही शुक्रवारी CSK विरुद्धच्या सामन्यानंतर विल्यमसनच्या दुखापतीबाबत अपडेट दिली. तो म्हणाला होता की, मी त्याला मेसेज केला होता आणि मला सध्या अपडेट माहिती नाही. ही दुखापत गुडघ्यात झाली आहे पण ती किती गंभीर आहे आणि ती बरी होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहीत नाही. त्याचवेळी न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले होते की, व्हाइट बॉल टीमच्या कर्णधाराला असे पाहणे चांगले वाटत नाही. संपूर्ण संघासाठी हा मोठा धक्का आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे आणि सध्या दुखापत किती गंभीर आहेत हे आम्ही सांगू शकत नाही.

विल्यमसनला दुखापत कशी झाली?

जोशुआ लिटल गुजरात टायटन्सच्या डावातील 13 वे षटक टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सीएसकेचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने एक लांबलचक फटका मारला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या केन विल्यमसनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तो सीमारेषेबाहेर गेला आणि त्याच्या गुडघ्याला मार लागला. याबरोरच तो वेदनेने विव्हळत जमिनीवर पडला. IPLच्या 76 सामन्यांत 2101 धावा करणाऱ्या केनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत संघाच्या 2 धावा वाचवल्या, पण त्याला स्वतःहून उठून चालता आले नाही. त्याला आधार देऊन बाहेर नेण्यात आले होते.