आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 5 पराभवानंतर कोलकाता विजयी:राजस्थानचा 7 गडी राखून पराभव, नितीश राणा, रिंकू सिंहची धमाकेदार खेळी

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. केकेआरसमोर 153 धावांचे लक्ष्य होते. ते संघाने शेवटच्या षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले. नितीश राणा (48) आणि रिंकू सिंह (42) यांनी चौथ्या विकेटसाठी 38 चेंडूत नाबाद 60 धावा करत केकेआरचा विजय निश्चित केला.

कोलकाताचा सलग 5 पराभवांनंतरचा हा पहिला विजय आहे. संघाने स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. केकेआरला 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. आरआरचा 10 सामन्यांमधील हा चौथा पराभव आहे. या संघाने 6 सामने जिंकले आहेत.

सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना आरआरने 152/5 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनने (54) सर्वाधिक धावा केल्या. त्याचवेळी, शेवटच्या षटकात हेटमायरने नाबाद खेळी करत 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थानला दीडशेचा टप्पा ओलांडता आला. केकेआरकडून टीम साऊदीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

सामन्याचे अपडेट्स ​​​​​​​

राणा आणि रिंकूची अप्रतिम खेळी

लक्ष्याचा पाठलाग करताना नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी अप्रतिम खेळी केली. राणाने 37 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचवेळी रिंकूने 23 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. रिंकूने या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.

श्रेयस आणि राणा यांची भागीदारी

केकेआरने 32 धावांवर पहिले दोन विकेट गमावले. बाबा इंद्रजीत (15) याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले आणि कुलदीप सेनच्या खात्यात आरोन फिंचची (4) विकेट आली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करत संघाला तारले. ट्रेंट बोल्टने श्रेयसला (34) बाद करून ही भागीदारी तोडली.

संजूची जोरदार खेळी

रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने चांगली फलंदाजी करत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक 38 चेंडूत पूर्ण केले. सध्याच्या स्पर्धेत संजूचा दुसरा आणि KKR विरुद्धचा तिसरा 50+ स्कोअर आहे.

  • करुण नायर 13 चेंडूत 13 धावा करून अनुकुल रॉयच्या गोलंदाजीवर बाद झाला.
  • नायर आणि संजू यांनी तिसऱ्या विकेटसाठी 28 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली
  • KKR साठी पहिला सामना खेळताना अनुकुल रॉयने 4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला.

बटलरची निराशाजनक कामगिरी

ऑरेंज कॅपधारक जोस बटलर या सामन्यात बॅटने काही खास दाखवू शकला नाही. तो 25 चेंडूत 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची विकेट सौदीच्या खात्यात आली आणि लाँग ऑनवर मावीने त्याचा झेल घेतला. जोसने आपल्या खेळीत केवळ 3 चौकार मारले.

  • या मोसमात बटलरने 10 डावात 65.33 च्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत.
  • बटलर आणि सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 39 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली.

RR ची संथ सुरुवात

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या RR ची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात देवदत्त पडिक्कल 5 चेंडूत 2 धावा काढून बाद झाला. उमेश यादवने त्याच्याच चेंडूवर त्याचा झेल टिपला. पहिल्या 6 षटकात संघाचा धावगती फक्त 6.33 होता. संघासाठी पॉवर प्लेमध्ये 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
RR: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (w/c), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.

केकेआर: आरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (क), बाबा इंद्रजीत (विकेटकीपर), नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी.

बटलरशिवाय उर्वरित फलंदाजांनाही जबाबदारी पार पाडावी लागणार.

राजस्थान रॉयल्सचा संघ स्पर्धेतील बलाढ्य संघांमध्ये गणला जात आहे. मात्र, गेल्या सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे जोस बटलरच्या 67 धावा व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी मोठी खेळी केली नाही.

राजस्थानला मिळालेल्या या पराभवामुळे साखळी सामन्यांमध्ये फारसा फरक पडणार नाही, पण प्लेऑफच्या वेळी अशा खराब फलंदाजीचा फटका संघाला बसू शकतो. जोस बटलर वेगळ्याच लयीत खेळत आहे, त्यामुळे बाकीच्या फलंदाजांनीही त्याला साथ देणे आवश्यक आहे. राजस्थानचे गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...