आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • KKR Players Have Purple, Orange Cap; Top Of The List Are Andre Russell (95) And Umesh Yadav (8 Wickets) | Marathi News

IPL 2022 आठवा सामना:केकेआरच्या खेळाडूकडे पर्पल, ऑरेंज कॅप; तालिकेत संघ अव्वल, आंद्रे रसेल (95 धावा) आणि उमेश यादव (8 बळी) कॅपचे मानकरी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत सत्राचा उपविजेता संघ कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी पंजाब किंग्जवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. केकेआरने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला १८.२ षटकांत १३७ धावांवर रोखले. त्यानंतर १४.३ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य सहज गाठले. केकेआरचा उमेश यादव (२३/४) व आंद्रे रसेल (३१ चेंडूत ७०* धावा) विजयाचे हीरो ठरले. सध्या सत्रात पर्पल व ऑरेंज कॅप दोन्ही केकेआरच्या खेळाडूकडे आहे. रसेलने २ डावांत ९५ धावा व उमेशने ३ लढतीत ८ बळी घेतले आहेत. दुसरीकडे, केकेआर गुणतालिकेतदेखील अव्वलस्थानी पोहोचला. उमेशचे पॉवरप्लेमध्ये ५० बळी पूर्ण झाले. तो अशी कामगिरी करणारा चौथा गोलंदाज बनला. रसेल १५०+ षटकार खेचणारा १३ वा खेळाडू बनला. त्याचे आयपीएलमध्ये १५४ षटकार झाले.

उमेश विरोधी फलंदाजांवर सलग दबाव बनवत आहे : उमेश यादव भारतीय क्रिकेटचा विसरलेला खेळाडू आहे. तो केवळ भारताच्या कसोटी संघाचा सदस्य असून त्याने द. आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेनंतर एकही सामना खेळला नव्हता. तो ज्या प्रकारे आयपीएलमध्ये कामगिरी करतोय ती स्वाभाविक आहे. तो वेग, फुल लेंथ व स्ट्रेट गोलंदाजी करतोय, ज्यामुळे फलंदाजांवर सतत दबाव येत आहे. पंजाबविरुद्ध कामगिरीचा विचार केल्यास त्याने दीर्घकाळ खेळलेला आहे. केकेआरसाठी दुसरी चांगली गोष्ट रसेल लयीत आला, त्याने सामना दुप्पट गतीने संपवला.

उमेश यादवचे ५० बळी पूर्ण
पावरप्लेमध्ये उमेश यादवचे ५० बळी पूर्ण झाले आहेत. तो अशी कामगिरी करणारा चौथ्या गोलंदाज बनला. उमेश २०१९, २०२०, २०२१ या तिन्ही सत्रात अपयशी ठरला होता. तो केवळ ८ गडी बाद करू शकला होता.

धावफलक, नाणेफेक कोलकाता (गोलंदाजी)

पंजाब किंग्ज धावा चेंडू ४ ६ मयंक पायचीत गो. यादव ०१ ०५ ०० ० धवन झे. बिलिंग्ज गो. साउदी १६ १५ ०१ १ राजपक्षे झे. साउदी गो. मावी ३१ ०९ ०३ ३ लिव्हिंगस्टोन झे. साउदी गो.यादव १९ १६ ०१ १ राज बावा त्रि. गो. नरेन ११ १३ ०१ ० शाहरुख झे. राणा गो. साउदी ०० ०५ ०० ० हरप्रीत बरार त्रि. गो. यादव १४ १८ ०१ १ ओडेन स्मिथ नाबाद ०९ १२ ०० १ चाहर झे. राणा गो. यादव ०० ०२ ०० ० रबाडा झे. साउदी गो. रसेल २५ १६ ०४ १ अर्शदीप सिंग धावबाद ०० ०१ ०० ० अवांतर : ११, एकूण : १८.२ षटकांत सर्व बाद १३७ धावा. गोलंदाजी : उमेश यादव ४-१-२३-४, साउदी ४-०-३६-२, शिवम मावी २-०-३९-१, वरुण चक्रवर्ती ४-०-१४-०, सुनील नरेन ४-०-२३-१, रसेल ०.२-०-०-१. कोलकाता नाइट रायडर्स धावा चेंडू ४ ६ रहाणे झे. स्मित गो. रबाडा १२ ११ ०३ ० व्यंकटेश झे. र्हप गो. स्मित ०३ ०७ ०० ० श्रेयस झे. रबाडा गो. चाहर २६ १५ ०५ ० सॅम बिलिंग्ज नाबाद २४ २३ ०१ १ राणा पायचीत गो. चाहर ०० ०२ ०० ० आंद्रे रसेल नाबाद ७० ३१ ०२ ८ अवांतर : ६, एकूण : १४.३ षटकांत ४ बाद १४१ धावा. गोलंदाजी : अर्शदीप सिंग ३-०-३२-०, कगिसो रबाडा ३-०-३२-१, ओडेन स्मिथ २-०-३९-१, चाहर ४-१-१३-२, हरप्रीत बरार २-०-२०-०, लिव्हिंगस्टोन ०.३-०-१३-०.

२० व्या वेळी केकेआरने पंजाबला हरवले. तो एका विरोधी संघाला सर्वाधिक वेळा हरवणारा दुसरा संघ बनला. मुंबईने केकेआरला २२ वेळा हरवले आहे.

आयपीएल-2022 गुणतालिका
टीम सामने विजय पराभव टाय एन/आर गुण रनरेट
कोलकाता 03 02 01 00 00 04 +0.843
राजस्थान 01 01 00 00 00 02 +3.050
दिल्ली 01 01 00 00 00 02 +0.914
गुजरात 01 01 00 00 00 02 +0.286
लखनऊ 02 01 01 00 00 02 -0.011
बंगळुरू 02 01 01 00 00 02 -0.048
पंजाब 02 01 01 00 00 02 -1.183
चेन्नई 02 00 02 00 00 00 -0.528
मुंबई 01 00 01 00 00 00 -0.914
हैदराबाद 01 00 01 00 00 00 -3.050

बातम्या आणखी आहेत...