आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता नाईट रायडर्सने (KKR) इंग्लंडच्या जेसन रॉयचा संघात समावेश केला आहे. KKR ने IPL 2023 साठी जेसन रॉयला 2.8 कोटी रुपयांना करारबद्ध केले. केकेआरचा श्रेयस अय्यर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने या हंगामासाठी त्याच्या अनुपस्थितीची पुष्टी केली आहे.
शाकिबच्या मतानुसार, तो बांगलादेशसाठी आयर्लंडविरुद्ध अजून कसोटी सामना खेळायचा आहे. यानंतर वैयक्तिक कारणांमुळे तो यंदाच्या स्पर्धेत भाग घेणार नाही. दुसरीकडे केकेआर आणि बांगलादेश संघाचा खेळाडू लिटन दास देखील आयर्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतरच केकेआरमध्ये सामील होणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद सोबत शेवटचा खेळला होता जेसन रॉय
जेसन रॉय याआधी 2017 आणि 2018 सीझनमध्ये खेळला होता, तो शेवटचा 2021 सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसला होता. 2021 मध्ये, त्याने पाच सामने खेळले आणि अर्धशतकासह 150 धावा केल्या. 32 वर्षीय खेळाडूने इंग्लंडसाठी 64 टी-20 सामने खेळले असून 8 अर्धशतकांसह 137.61 च्या स्ट्राइक रेटने 1522 धावा केल्या आहेत.
केकेआरने शाकिबला दीड कोटी रुपयांना खरेदी केले होते
IPL 2023 च्या लिलावात KKR ने शाकिब अल हसनला 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले. फ्रँचायझी आणि शाकिब यांच्यात सीझन सुरू होण्याआधीच तर्कवितर्कांना उधाण आले होते. बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिब आणि लिटन दस यांना सोडण्यास नकार दिला आहे. जेणेकरून दोघेही मीरपूर कसोटीचा भाग होऊ शकतील.
मुळात फ्रँचायझींना वाटले होते की, शाकिब आणि दास कसोटी सामना वगळून केकेआरचा भाग होऊ शकतात परंतू तसे झालेच नाही.
गुरनूर पंजाब किंग्जमध्ये सामील झाला
पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा दुखापतीमुळे लीगच्या या मोसमातून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीने त्याच्या जागी गुरनूर सिंग ब्रारचा संघात समावेश केला आहे. पंजाबने गुरनूरला 20 लाख रुपयांची डील केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.