आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL खेळाडूंना कोरोना:KKR च्या सिफर्टसोबतच प्रसिद्ध कृष्णालाही कोरोनाची लागण, कालच भारतीय संघात निवड झाली होती, आतापर्यंत 11 खेळाडू आणि 3 कोच पॉझिटिव्ह

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच आहे. शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे आणखी 2 खेळाडू संक्रमित आढळले. यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टिम सिफर्ट यांचा समावेश आहे. कालच, इंग्लंड दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय संघात स्टँडबाय म्हणून प्रसिद्ध कृष्णाची निवड झाली होती. सिफर्ट सध्या अहमदाबादमधील आयसोलेशन सेंटरमध्ये क्वारंटाईन आहे. न्यूझीलंडच्या उर्वरित क्रिकेटपटूंसोबत तो आता मायदेशी परत जाऊ शकणार नाही.

केकेआरचे 5 खेळाडू आतापर्यंत संक्रमित झाले असून यामध्ये प्रसिद्ध आणि सिफर्ट यांचा समावेश आहे. यापूर्वी नितीश राणा, वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत एकूण 11 खेळाडू आणि 3 सहाय्यक प्रशिक्षकांनाही कोरोना संक्रमण झाले आहे.

टीम इंडियामध्ये प्रसिद्ध कृष्णाला स्टँडबायवर ठेवण्यात आले होते
शुक्रवारी चीफ सलेक्टर चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात प्रसिद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड दौर्‍यासाठी निवड झाली. त्याला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. 25 मे रोजी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना इंग्लंड दौर्‍याआधी 8 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. परंतु आता प्रसिद्धला फिटनेस टेस्ट क्लिअर करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...