आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • KKR Vs DC 25th IPL Match LIVE Score; Rishabh Pant Andre Russell | Ahmedabad Narendra Modi Stadium News | Kolkata Knight Riders Vs Delhi Capitals IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DC vs KKR:पृथ्वी शॉचे 18 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक, दिल्ली कॅपिटल्सचा कोलताना नाइट रायडर्सवर 7 गडी राखून विजय

अहमदाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिखर धवन सर्वाधिक रनांच्या यादीत दुसऱ्या स्थानी

IPL 2021 चा 25वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकातावर सात गडी राखून विजय मिळवला. 7 पैकी 5 सामने जिंकून दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर पोहोचली आहे. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने या मोसमातील सर्वात वेगवान 18 बॉलमध्ये अर्धशतक केले. तसेच, शिखर धवनने आयपीएलमध्ये 5508 धावा करत सुरेश रैनाला मागे टाकले आहे. आता सर्वाधिक रनांच्या यादीत शिखर कोहलीनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दिल्लीची कामगिरी

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने दिल्लीला 155 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने 3 विकेट गमावून 156 रन करत सामना खिशात घातला. या सामन्यात पृथ्वी शॉने 41 बॉलमध्ये 82 आणि शिखर धवनने 47 बॉलमध्ये 46 रनांची खेळी केली. तर, कोलतानाकडून पॅट कमिंसने 3 विकेट घेतल्या. कमिंसने पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि ऋषभ पंत (16 रन) ला आउट केले.

केकेआरची कामगिरी

कोलकाताकडून आंद्रे रसेलने 27 बॉलमध्ये 45 रन आणि शुभमन गिलने 38 बॉलवर 43 रनांची खेळी केली. तर, दिल्लीचा स्पिनर ललित यादव आणि अक्षर पटेलने 2-2 आणि आवेश खान आणि मार्कस स्टोइनिसने 1-1 विकेट घेतल्या.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, इशांत शर्मा, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, ललित यादव आणि आवेश खान.

कोलकाता: ओएन मोर्गन (कर्णधार), नीतीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, आंद्रे रसेल, पैट कमिंस, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा.

बातम्या आणखी आहेत...