आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील रविवारच्या पहिल्या रोमांचक डबल हेडरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सला घरच्या मैदानावर 3 गड्यांनी हरवले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरातने दिलेले 205 धावांचे आव्हान कोलकात्याने 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रिंकू सिंग कोलकात्याच्या विजयाचा हिरो ठरला. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी 29 धावांची गरज असताना रिंकूने सलग 5 षटकार ठोकत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
कोलकात्याचा डाव
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातने 4 गडी गमावून 20 षटकांत 204 धावा करत कोलकात्याला 205 धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना मैदानावर उतरलेल्या कोलकात्याला तिसऱ्या षटकात पहिला झटका बसला. कोलकात्याचा ओपनर रहमानउल्लाह गुरबाज शमीच्या चेंडूवर यश दयालच्या हाती झेलबाद झाला. यानंतर चौथ्या षटकात त्यांचा नारायण जगदीशनही जोशुआ लिटलच्या चेंडूवर अभिनव मनोहरच्या हाती झेलबाद झाला. गुरबाजने 15 तर जगदीशनने 6 धावा केल्या. नंतर व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाने शतकी भागीदारी करत कोलकात्याचा डाव सावरला. मात्र चौदाव्या षटकात अल्झारी जोसेफने नितीश राणाला शमीच्या हाती झेलबाद केले. त्याने 29 चेंडूंत 45 धावा केल्या. त्यानंतर व्यंकटेशने रिंकूच्या साथीने डाव पुढे नेत फटकेबाजी सुरूच ठेवली. मात्र सोळाव्या षटकात अल्झारी जोसेफने अय्यरला शुभमन गिलच्या हाती झेलबाद केले. अय्यरने 40 चेंडूंत 83 धावा केल्या. त्यानंतर सोळाव्या षटकात राशिद खानने आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूरला सलग तीन चेंडूंवर बाद करत हॅट्ट्रिक केली. यामुळे कोलकात्याचा संघ अडचणीत आला असे वाटत होते. मात्र रिंकू सिंगने शेवटच्या षटकात 5 षटकारांची स्फोटक विजयी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
अशा पडल्या कोलकात्याच्या विकेट
कोलकात्याच्या पॉवर प्लेमध्ये 2 विकेट
205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कोलकात्याची सुरुवात चांगली राहिली नाही. सुरूवातीच्या 6 षटकांत कोलकात्याने 2 गडी गमावत 48 धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज 15 आणि एन जगदीशन 6 धावा करून आऊट झाले. मोहम्मद शमी आणि जोशुआ लिटलला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
तत्पूर्वी फलंदाजी केलेल्या गुजरातकडून विजय शंकरने सर्वाधिक 63 धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शनने 53 तर शुभमन गिलने 39 धावा केल्या. कोलकात्याकडून सुनील नारायणनने 3 तर सुयश शर्माने 1 विकेट घेतली.
गुजरातचा डाव
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरातचा ओपनर वृद्धिमान साहा 17 धावा काढून पाचव्या षटकात बाद झाला. सुनील नारायणने त्याची विकेट घेतली. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने कोलकात्याचा डाव सावरला. मात्र बाराव्या षटकात सुनील नारायणने त्याला उमेश यादवच्या हाती झेलबाद केले. गिलने 39 धावा केल्या. यानंतर आलेल्या अभिनव मनोहरला सुयश शर्माने चौदाव्या षटकात बोल्ड केले. अभिनवने 14 धावा केल्या. यानंतर सुदर्शनने विजय शंकरसोबत गुजरातचा डाव सावरला. त्याने झुंजार अर्धशतकी खेळी केली. मात्र नंतर अठराव्या षटकात सुनील नारायणच्या चेंडूवर तो अनुकूल रॉयकडून झेलबाद झाला. सुदर्शनने 38 चेंडूंत 53 धावा केल्या. यानंतर विजय शंकरने शेवटच्या षटकांत जोरदार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या दोनशेपार नेली. त्याने 24 चेंडूंत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने धुँवाधार नाबाद 63 धावा केल्या. तर डेव्हिड मिलरने नाबाद 2 धावा केल्या.
अशा पडल्या गुजरातच्या विकेट
विजय शंकरचे 21 चेंडूंत अर्धशतक
विजय शंकरने IPL करियरमधील चौथे अर्धशतक केले. या हंगामातील त्याचे हे पहिले अर्धशतक आहे. त्याने शेवटच्या षटकांत जोरदार फटकेबाजी करत 21 चेंडूंत अर्धशतक केले. पाच षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने त्याने वेगवान धावा केल्या.
सुदर्शनचे 34 चेंडूंत अर्धशतक
तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या सुदर्शनने कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक केले. हे त्याचे हंगामातील दुसरे अर्धशतक आहे. त्याने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने शुभमनसोबत 44 चेंडूंत 67 धावांची भागीदारी केली.
गिल-सुदर्शनची अर्धशतकी भागीदारी
साहा आऊट झाल्यावर शुभमन गिलने साई सुदर्शनसह गुजरातचा डाव सावरला. दोघांनी 44 चेंडूत 67 धावा केल्या. सुनील नारायणनने गिलला आऊट करून ही जोडी फोडली. गिल 39 धावा करून बाद झाला.
गुजरातच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये केल्या 54 धावा
सुरुवातीच्या 6 षटकांत गुजरातच्या टीमने एक गडी गमावून 54 धावा केल्या. ओपनर वृद्धिमान साहा 17 धावा करून आऊट झाला. सुनील नरेनने त्याला आपल्या पहिल्याच षटकात बाद केले. नंतर गिल आणि सुदर्शनने धावसंख्या 50 वर नेली.
दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्ज (PBKS) हे संघ आमनेसामने असतील.
दोन्ही संघाचे प्लेइंग-11....
गुजरात टायटन्स : राशिद खान (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, यश दयाल आणि अल्झारी जोसेफ.
इम्पॅक्ट खेळाडू: जोशुआ लिटल, जयंत यादव, श्रीकर भरत, मोहित शर्मा आणि मैथ्यू वेड.
कोलकाता नाईट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेट-कीपर), नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरायण, लोकी फर्ग्युसन, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट खेळाडू : मनदीप सिंह, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, व्यंकटेश अय्यर, डेविड वॅस.
गुजरातने सलग 2 सामने जिंकले
या मोसमातील गुजरात टायटन्सचा हा तिसरा सामना असेल. संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले. टायटन्सने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पराभव केला. गुजरातने पाठलाग करताना दोन्ही सामने जिंकले.
राशिद खान, डेव्हिड मिलर, जेशुआ लिटल आणि अल्झारी जोसेफ हे कोलकाताविरुद्ध संघाचे 4 परदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि राहुल तेवतिया हे देखील संघाला मजबूत करत आहेत.
शार्दुलच्या फलंदाजीने केकेआरला बळ दिले
कोलकाता नाईट रायडर्सचाही या मोसमातील हा तिसरा सामना असेल. एका सामन्यात संघ पराभूत झाला आणि दुसरा सामना जिंकला. पहिल्या सामन्यात पंजाबकडून नाइट रायडर्सचा ७ धावांनी पराभव झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने बंगळुरूचा 81 धावांनी पराभव केला, या सामन्यात शार्दुल ठाकूरने 29 चेंडूत 68 धावा करत संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली.
रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि टीम साऊदी हे गुजरातविरुद्धच्या संघाचे 4 परदेशी खेळाडू असू शकतात. त्यांच्याशिवाय नितीश राणा, रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती हेही संघाला मजबूत करत आहेत. त्याचबरोबर जेसन रॉयही कोलकाता कॅम्पमध्ये दाखल झाला आहे.
कोलकाताला गुजरातकडून मागील पराभवाचा बदला घ्यायचा
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा हा केवळ दुसरा हंगाम आहे. पहिल्या सत्रात या संघाने अव्वल स्थान पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर केकेआर आणि जीटी यांची लीग टप्प्यात एकदा गाठ पडली होती. गुजरातने तो सामना जिंकला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.