आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KKR Vs PBKS:कोलकाताकडून पंजाबचा 5 गडी राखून पराभव, केकेआरचा चार पराभवानंतर पहिला विजय

अहमदाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोलकाताने पंजाबला मागील 6 सामन्यात पाचव्यांदा हरवले

IPL 2021 सीजनचा 21वा सामना पंजाब किंग्स (PBKS) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR)दरम्यान झाला. यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने सलग 4 पराभवानंतर पहिला विजय मिळवला आहे. कोलकाताने आज झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS)चा 5 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह कोलकाता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आली आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने कोलकाताला 124 धावांचे लक्ष्य दिले होते. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सने 9 विकेट गमावून 123 रन काढले होते. प्रत्युत्तरात कोलकाताने 5 विकेट गमावून 16.4 ओव्हरमध्ये 126 रन काढून सामना आपल्या नावे केला. कोलतानाकडून राहुल त्रिपाठीने 32 बॉलमध्ये 41 आणि कर्णधार ओएन मोर्गनने 40 बॉलमध्ये 47 रनांची खेळी केली. दरम्यान, पंजाबकडून मोइसेस हेनरिक्स, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह आणि दीपक हूडाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पंजाबची कामगिरी

पंजाब किंग्सकडून मयंक अग्रवालने 34 बॉलमध्ये सर्वाधिक 31 आणि क्रिस जॉर्डनने 18 बॉलमध्ये 30 रन केले. याशिवाय कर्णधार लोकेश राहुल आणि निकोलस पूरन 19-19 धावांवर आउट झाले. कोलकाताकडून, स्पिनर सुनील नरेन आणि फास्ट बॉलर पॅट कमिंसने 2-2 विकेट घेतल्या

दोन्ही संघ

कोलकाता: ओएन मोर्गन (कर्णधार), नीतीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, आंद्रे रसेल, पैट कमिंस, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा.

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, मोइसेस हेनरिक्स, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरूख खान, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.

बातम्या आणखी आहेत...