आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) 9 गड्यांनी विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाताने विजयासाठी दिलेले 150 धावांचे आव्हान राजस्थानने 13.1 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले.
जैस्वालच्या 98 धावा, सॅमसनच्या 48 धावा
राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक नाबाद 98 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसनने 48 धावा केल्या. कोलकाताकडून एकाही गोलंदाजाला विकेट मिळवता आली नाही.तत्पूर्वी राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलताने 20 षटकांत 8 गडी गमावून 149 धावा करत राजस्थानला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले.
राजस्थानचा डाव
याचा पाठलाग करताना ओपनर यशस्वी जैस्वालने संघाला जोरदार सुरूवात करून दिली. त्याने पहिल्या षटकात दमदार 26 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात राजस्थानला पहिला झटका बसला. राजस्थानचा दुसरा ओपनर जोस बटलर दुसऱ्या षटकात शून्यावरच धावबाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसनने तडाखेबंद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या राजस्थानच्या विकेट
अय्यरची फिफ्टी, चहलच्या 4 विकेट
कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्यानंतर नितीश राणाने 22, रहमानुल्लाह गुरबाजने 18, रिंकू सिंहने 16, आंद्रे रसेल आणि जेसन रॉयने प्रत्येकी 10 धावा केल्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने 4, ट्रेंट बोल्टने 2, तर केएम आसिफ आणि संदीप शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलकाताचा डाव
प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर जेसन रॉय तिसऱ्या षटकात 10 धावांवर बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याची विकेट घेतली. त्यानंतर बोल्टने पाचव्या षटकात रहमानुल्लाह गुरबाजलाही 18 धावांवर बाद केले. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाने डाव सावरत तिसऱ्या गड्यासाठी 48 धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात नितीश राणाला 22 धावांवर बाद करत युजवेंद्र चहलने ही जोडी फोडली. त्यानंतर चौदाव्या षटकात केएम आसिफने आंद्रे रसेलला 10 धावांवर बाद केले. तर सतराव्या षटकात चहलने व्यंकटेश अय्यरला 57 धावांवर, तर शार्दुल ठाकूरला 1 धावेवर बाद केले. चहलने एकोणिसाव्या षटकात रिंकू सिंहलाही 16 धावांवर बाद केले. अनुकूल रॉय आणि सुनील नारायणने शेवटपर्यंत खेळत संघाची धावसंख्या 149 वर नेऊन पोहोचवली. सुनील नारायण शेवटच्या चेंडूवर आऊट झाला.
अशा पडल्या कोलकाताच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग-11...
कोलकाता नाईट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, रहमानुल्लाह गुरबाज, आंद्रे रसेल, सुनील नारायण, रिंकू सिंह, अनुकूल रॉय, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर्स : सुयश शर्मा, मनदीप सिंह आणि वैभव अरोरा.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आणि युजवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर्स : देवदत्त पडिक्कल, एडम झम्पा, रियान पराग, जेसन होल्डर, ओबेड मॅकॉय.
कोलकाताने 10 पैकी 5 सामने जिंकले
कोलकाताने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 5 सामने जिंकले तर 6 गमावले आहेत. संघाचे 10 गुण आहेत. रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन हे राजस्थानविरुद्ध संघाचे 3 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय रिंकू सिंह, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत.
राजस्थानने मागील तीन सामने गमावले
राजस्थानने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. संघाचे 10 गुण आहेत. राजस्थानने मागील तीनही सामने गमावले होते. कोलकात्याविरुद्धच्या संघाचे तीन विदेशी खेळाडू जॉस बटलर, जो रूट आणि शिमरॉन हेटमायर असू शकतात. याशिवाय यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे खेळाडू दमदार खेळत आहेत.
हेड टू हेड
कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील एकूणच हेड टू हेडबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाताने 14 वेळा तर राजस्थानने 12 वेळा बाजी मारली आहे. एक सामना रद्द झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.