आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KKR vs SRH सामना आज:सीझनमध्ये फक्त 2 विदेशी कर्णधार, डेव्हिड वाॅर्नरच्या नेतृत्वात हैदराबाद संघाची नजर पहिल्या विजयाकडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या सत्रातील आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात रविवारी दोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे विजयी सलामी देण्याच्या इराद्याने २०१६ वेळचा चॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद संघही याच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे आज हैदराबाद आणि काेलकाता यांच्यात सामना रंगणार आहे. KKR संघाचा कर्णधार इंग्लंडचा खेळाडू ईऑन मॉर्गन आहे तर SRH चा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर आहे. कर्णधार डेव्हिड वाॅर्नरच्या नेतृत्वात हैदराबाद संघाची नजर पहिल्या विजयाकडे लागली आहे.हा सामना चेन्नईच्या चेपाॅक मैदानावर खेळवला जाईल.

हैदराबादच्या आघाडीच्या फळीत अनेक अडचणी आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो व केन विल्यम्सन पैकी केवळ दोन फलंदाज खेळू शकतील. वृद्धिमान साहा डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. गत सत्राच्या अखेरच्या सामन्यात त्याने सलामीला फलंदाजी करत चांगली खेळी केली होती. मनीष पांडे व केदार जाधवचा अनुभव मधल्या फळीत महत्त्वाचा ठरेल.

अष्टपैलू म्हणून विजय शंकर व वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर आहेत. संघाकडे प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा व अब्दुल समद सारखे युवा फलंदाज पर्यायी आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये संदीप शर्मा व भुवनेश्वर कुमार संघाची पहिली पसंत असेल. फिरकीपटूमध्ये राशिद खान व शाहबाज नदीम हे अनुभव गोलंदाज आहेत. शुभमन गिल व राहुल त्रिपाठीनंतर नीतीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल व इयोन मॉर्गन सारखे युवा व अनुभवी फलंदाज आहेत. बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसन २०१९ नंतर पुनरागमन करत आहे.

बातम्या आणखी आहेत...