आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2021:काेलकाता नाइट रायर्डस संघ विजयी; हैदराबाद संघावर केली मात, 10 धावांनी 100 वा विजय साजरा

चेन्नई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर नितीश राणा (८०) आणि राहुल त्रिपाठीच्या (५३) अर्धशतकी खेळीपाठाेपाठ गाेलंदाजांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्स संघाने रविवारी आयपीएलमध्ये दणदणीत विजय संपादन केला. इयान माॅर्गनच्या नेतृत्वात काेलकाता संघाने लीगच्या आपल्या पहिल्याच सामन्यात डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद टीमवर १० धावांनी मात केली. यासह काेलकाता संघाने आयपीएलमध्ये विजयाचे शतक साजरे केले. लीगमध्ये १०० सामने जिंकणारा काेलकाता हा तिसरा संघ ठरला. काेलकाता संघाने विजयाचे शतक हे आयपीएलच्या आपल्या १९३ व्या सामन्यात साजरे केले. सर्वाधिक १२० विजयासह मुंबई इंडियन्स संघ अव्वल स्थानावर आहे. चेन्नई १०६ विजयासह दुसऱ्या स्थानी आहे.

प्रथम फलंदाजी करताना काेलकाता नाइट रायडर्स संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात हैदराबादसमाेर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात हैदराबाद टीमला ५ गडी गमावून १७७ धावांपर्यंत मजल मारता आली. धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची निराशाजनक सुरुवात झाली. टीमची वृद्धिमान साहा (७) आणि कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (३) ही सलामीची जाेडी सपशेल अपयशी ठरली. त्यानंतर तिसऱ्या स्थानावरील मनीष पांडे आणि चाैथ्या स्थनावरील बेअरस्टाेने संघाचा डाव सावरला. या दाेघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. यादरम्यान बेअरस्टाेने अर्धशतक साजरे केले. त्याने ४० चेंडूंमध्ये ५५ धावा काढल्या. यामध्ये पाच चाैकार व तीन षटकारांचा समावेश आहे.

नितीश राणाचे झंझावाती अर्धशतक
काेलकाता नाइट रायडर्स संघाचा सलामीवीर नितीश राणा सामन्यात चमकला. त्याने आपल्या टीमच्या पहिल्याच सामन्यात झंझावाती खेळीतून अर्धशतक साजरे केले. त्याने ५६ चेंडूंचा सामना करताना नऊ चाैकार आणि चार षटकारांच्या आधारे ८० धावा काढल्या. तसेच टीमच्या राहुल त्रिपाठीने ५३ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...