आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • KKR Vs SRH IPL 2021; Nitish Rana Eoin Morgan | Why Sunrisers Hyderabad SRH Lost The Third Match; Analysis Of Kolkata Knight Riders

KKR च्या विजयाचे विश्लेषण:हैदराबाद संघाला फलंदाजीचा योग्य क्रम लावता आला नाही; आंद्रे रसेल गोलंदाजीमध्ये बनला कर्णधार मॉर्गनचा ट्रम्प कार्ड

चेन्नई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाणेफेक जिंकून KKR संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

इंडियन प्रीमियर लीग 2021 ची सुरुवात नुकतीच झाली आहे. दरम्यान, रविवारी कोलकाता नाईड रायडर्स आणि सनराइजर्स हैदराबाद या दोन्ही संघामध्ये सामनाचे आयोजन होते. दरम्यान, KKR संघाने हैदराबाद संघाला 10 धावांनी पराभूत केले. कोलकाता नाईड रायडर्सचा कर्णधार ओएन मॉर्गनने आपल्या इंग्लंड संघासारखी आक्रमक खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यासोबतच हैदराबाद संघाला फलंदाजीची योग्य क्रमवारी न लावता आल्यामुळे त्यांचा चांगलाच फटका संघाला बसला. चला पाहूया कोलकाता नाईड रायडर्स संघांची विजयाची पाच कारणे...

1. राणा आणि राहुलची वेगवान फलंदाजी
नाणेफेक जिंकून KKR संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत संघाची सुरुवात चांगली झाली. त्यानंतर सलामवीर नीतीश राणा (56 चेंडूत 80 धावा) आणि तीन क्रमांकावर आलेल्या राहुल त्रिपाठीने (29 चेंडूत 53 धावा) चांगली फलंदाजी करत संघाची बाजू मजबूत केली. KKR ने 15.1 षटकांत एक विकेट गमवत 145 धावा बनविल्या. शेवटच्या षटकांत दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 22 धावां करत संघाला 187 धावांवर पोहचवले. नीतीश राणाने 142, त्रिपाठीने 182 आण‍ि कार्तिकने 244 के स्ट्राइक रेटनुसार फलंदाजी केली.

राणा आणि राहुलची वेगवान फलंदाजी
राणा आणि राहुलची वेगवान फलंदाजी

2. सनरायझर्सचा स्ट्राइक गोलंदाज अपयशी ठरला
सनरायझर्सने हैदराबाद संघाने या संघात भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा यांच्या जोरावर गोलंदाजीची सुरुवात केली. परंतु, त्या दोघांनीही चांगली कामगिरी बजावता आली नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 45 धावा दिल्या. तर दुसरीकडे, संदीपनेदेखील 3 षटकांत 35 धावा दिल्या. यासोबतच टी. नटराजननेही 4 षटकांत 37 धावा दिल्या.

3. वॉर्नर-साहाची सलामी जोडीने चांगली सुरुवात केली नाही
या सामनादरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाला एका चांगल्या सुरुवातीची गरज होती. परंतु, संघाच्या दोन्ही सलामवीरांची जोडी अपयशी ठरली. साहा 7 आणि वॉर्नर 3 धावा काढून पव्हेलियनमध्ये परत गेले. त्यांनर संघातील मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी डाव हाताळण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.

वॉर्नर-साहाची सलामी जोडीने चांगली सुरुवात केली नाही
वॉर्नर-साहाची सलामी जोडीने चांगली सुरुवात केली नाही

4. शेवटच्या षटकात सनरायझर्सची चूक

दरम्यान, सनरायझर्स संघाने 12 षटकांत दोन गडी गमावून 100 धावा केल्या होत्या. त्यानुसार संघाला विजयी होण्यासाठी 8 षटकांत 11 च्या रनरेटनुसार 88 धावांची आवश्यकता होती. मात्र, 13 व्या षटकात जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर संघाचा डाव उतरला. मनीष पांडेने डेथ ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी न करता शेवटच्या 12 चेंडूत फक्त एक षटकार ठोकला. त्यानंतर आलेल्या कोणत्याच खेळाडूने चांगली कामगिरी बजावली नाही. परिणामी संघाला पराभूत व्हावे लागले.

5. आंद्रे रसेलने शेवटची दोन षटके चांगली टाकली
या सामनादरम्यान, केकेआरचा ऑल राऊंडर आंद्रे रसेलने शेवटची दोन षटकांत चांगली गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या दोन षटकांत अनुक्रमे 6 आण‍ि 11 धावा दिल्या. रसेलची ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासी गोलंदाजी करण्याची त्यांची रणनीती यशस्वी ठरली. या पाच कारणांमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयी झाला.

बातम्या आणखी आहेत...