आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाच्या दुखापतीवर सुनील शेट्टी म्हणाला-:राहुलच्या अनुपस्थितीत दुसरा खेळाडू खेळेल; खेळापेक्षा कोणी मोठा नसतो

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटपटू आणि लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. यावर त्याचे सासरे सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुलला लवकर बरे होण्यासाठी सुनील शेट्टीने शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनील शेट्टीने म्हटले आहे की, राहुल पुढच्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी उपलब्ध नसेल पण त्याच्या अनुपस्थितीत आणखी काही खेळाडूंना संधी मिळेल, ही चांगली गोष्ट आहे. खेळाडू कोणताही असो, तो खेळापेक्षा मोठा नसतो, असे सुनीलने म्हटले आहे.

राहुलवर आज शस्त्रक्रिया होणार आहे

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, 'राहुलवर 9 तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे. त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे. तो WTC फायनलमध्ये नसेल, परंतु दुसर्‍या खेळाडूसाठी ही एक उत्तम संधी असू शकते. भारतीय क्रिकेट संघात खूप चांगले खेळाडू आहेत.

पायाला दुखापत असूनही फलंदाजी केली

1 मे रोजी लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुलला दुखापत झाली होती. आरसीबीच्या डावाच्या दुसऱ्या षटकात फाफ डू प्लेसिसने टोलवलेला चेंडू थांबवताना त्याच्या पायाच्या स्नायूंत तणाव आला होता.

यानंतर राहुल मैदानाबाहेर गेला. दुखापतीनंतरही राहुल फलंदाजीला आला, मात्र त्याचा संघ 18 धावांनी पराभूत झाला. त्याच्या स्नायूंना खोल दुखापत झाली आहे.

राहुल हा रस्त्यावरचा खेळाडू नाही - सुनील

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने राहुलच्या खेळावर भाष्य केले होते. गेल्या काही काळापासून त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी नाही हे उघड आहे. त्याला चाहत्यांच्या आणि माजी क्रिकेटपटूंच्या टीकेला सामोरे जावे लागले.

त्यामुळे दुखावलेल्या सुनील शेट्टी म्हणाले की, राहुल खराब खेळला तरी आमच्या घरात त्याची चर्चा होत नाही. तो एक फायटर आहे हे आम्हाला माहीत आहे. तो त्याच्या खेळात तरबेज आहे, मग त्याला कोणी काय शिकवणार? तो देशासाठी क्रिकेट खेळतो. कुठेही रस्त्यावर किंवा गल्लीत क्रिकेट खेळत नाही, की कुणीही येऊन त्याला सांगावे, असे खेळ, तसे खेळ.

'शब्दांनी नव्हे तर बॅटने उत्तर देईन'

सुनील पुढे म्हणाला, 'मला तो मुलगा दिसतो जो कठीण काळातून जात आहे. पण तरीही तो उभा आहे आणि आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे. तो शब्दांनी नव्हे तर बॅटने उत्तर देईल. त्याला मैदानावर जाऊन चेंडूचा सामना करावा लागेल.'

मुलीला दक्षिण भारतीय मुलगा मिळावा अशी इच्छा होती, राहुल भेटल्यावर ती इच्छा पूर्ण झाली

सुनील शेट्टीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी राहुलला पहिल्यांदा विमानतळावर भेटलो होतो. तो म्हणाला, 'जेव्हा मी राहुलला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला कळले की तो मंगळुरूचा आहे. मी पण तिथलाच आहे. मी त्याच्या खेळाचा खूप मोठा चाहता होतो, तो त्याच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे हे पाहून मला आनंद झाला.

जेव्हा मी घरी आलो आणि माझी पत्नी आणि मुलगी अथियाला या भेटीबद्दल सांगितले तेव्हा त्या एकमेकांचा चेहरा पाहू लागल्या. नंतर मानाने सांगितले की अथिया आणि राहुल आधीपासूनच एकमेकांच्या संपर्कात आहेत.

सुनील शेट्टीने त्या मुलाखतीत पुढे सांगितले की, तो आनंदी आहे कारण अथियाने दक्षिण भारतीय मुलाशी आपले संबंध जोडावेत अशी त्याची नेहमीच इच्छा होती. तो म्हणाला, 'मला आश्चर्य वाटले की अथियाने माझ्याकडे राहुलचा कधीही उल्लेख केला नाही. मी आनंदी होतो कारण मी अथियाला नेहमीच दक्षिण भारतीय मुलांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला होता. राहुलच्या मंगळूरच्या घरापासून माझे जन्मस्थानही हाकेच्या अंतरावर आहे हा एक आनंदी योगायोग होता.